Twitter Deal: ट्विटरच्या शेअरहोल्डर्सची एलन मस्कच्या बायआउट डीलला ग्रीन सिग्नल

ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी एलन मस्कच्या $44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी दिली आहे.
Twitter Deal
Twitter DealDainik Gomantak

ट्विटरच्या शेअर होल्डर्सने इलॉन मस्कच्या (Elon Musk) $44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी दिली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. एलन मस्कने यापूर्वी हा करार रद्द केला होता. ट्विटरने मंगळवारी सांगितले की काउंटिंगमध्ये असे दिसून आले आहे की शेअर होल्डर्सने एलन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला $ 44 बिलियनमध्ये विकत घेण्याच्या बोलीला समर्थन दिले, जरी तो कराराचा भंग करण्याचा प्रयत्न करत होता.

शेअर होल्डर्सच्या बैठकीदरम्यान ही आकडेवारी आली आहे. जी केवळ काही मिनिटे चालली, बहुतेक मते ऑनलाइन टाकली गेली. ट्विटरने करार पूर्ण करण्यासाठी मस्कवर दावा दाखल केला असून त्याची सुनावणी ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एलन मस्कने एप्रिलमध्ये ट्विटरशी $ 54.20 प्रति शेअर दराने सुमारे $ 44 अब्जचा करार केला होता. या करारानंतर काही दिवसांनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू झाला. एलन मस्क यांनी ट्विटरवर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि म्हटले की, त्याने $44 अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली तेव्हा ट्विटरने त्याला दिशाभूल करणारी व्यावसायिक माहिती दिली.

Twitter Deal
फ्रेंच सिनेमाचे गॉडफादर Jean Luc Godard यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन

मस्कने सांगितले होते की, जेव्हा त्यांनी ट्विटरला बॉट अकाऊंट्स म्हणजेच बनावट अकाऊंटचे तपशील मागितले तेव्हा ट्विटरने त्याला नकार दिला. मग मस्कने हा करार होल्डवर ठेवला. मस्कने ट्विटरला इशारा दिला होता की जर कंपनीने त्यांच्या बनावट खात्यांची माहिती दिली नाही तर तो करार रद्द करेल. त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी हा करार रद्द केला.

एलन मस्कने न्यायालयात घेतली होती धाव

इलॉन मस्क यांनीही ट्विटरविरोधात (Twitter) न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात, 27 ऑगस्ट रोजी न्यायालयाने ट्विटरला गेल्या वर्षी सर्वेक्षण केलेल्या 9,000 खात्यांचे तपशील शेअर करण्याचे आदेश दिले आहेत.

ट्विटरनेही हे प्रकरण केले आहे

ट्विटरने हा करार रद्द करण्याऐवजी तो पूर्ण करण्यासाठी केसही दाखल केली. खटला दाखल करताना ट्विटरने मस्कवर आरोप केला होता की इलॉन मस्क कोणत्याही वादाविना करार रद्द करत आहेत. या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरमध्ये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, आज ट्विटरच्या भागधारकांनी एलोन मस्कच्या $ 44 अब्ज खरेदी कराराला मंजुरी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com