Twitter Big Data Leak: ट्विटरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक! तब्बल 'इतक्या' कोटी लोकांचे डीटेल्स चोरीला...

डेटा हॅकमुळे ट्विटर युजर्स संकटात सापडण्याची शक्यता
Twitter
TwitterDainik Gomantak

Twitter Big Data Leak: सोशल मीडिया युजर्सनी खूप सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे, कारण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांची खासगी माहिती चोरली जात आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया साइटच्या 23 कोटींहून अधिक युजर्सचा तपशील चोरल्याचे समोर आले आहे. सुमारे 23 कोटी ट्विटर वापरकर्त्यांचे ईमेल पत्ते चोरीला गेले आणि ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले गेले आहेत.

Twitter
Tokyo: टोकियो शहर सोडण्यासाठी जपान सरकारकडून नागरिकांना तब्बल 6 लाख रुपयांची ऑफर; 'हे' आहे कारण...

अमेरिकेतील द वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, हे रेकॉर्ड 2021 च्या उत्तरार्धात संकलित केले गेले असण्याची शक्यता आहे. या डेटा हॅकमुळे सरकार किंवा शक्तिशाली व्यक्तींवर टीका करण्यासाठी ट्विटरचा वापर करणाऱ्यांना अटक होऊ शकते, किंवा त्यांच्याबाबत हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातून खंडणीची प्रकरणेही समोर येऊ शकतात. कारण हॅकर्स पासवर्ड रीसेट करण्यासाठी आणि खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ईमेल पत्ते देखील वापरू शकतात.

इस्त्रायली सुरक्षा कंपनी हडसन रॉकचे सह-संस्थापक अलोन गल म्हणाले की ईमेलचा तपशील लीक केल्याने हॅकिंग आणि फिशिंगला प्रोत्साहन मिळेल. सरकारकडून नागरिकांच्या गोपनीयतेला आणखी हानी पोहोचू शकते.

Twitter
Prince Harrys Book: 'मी 25 तालिबान्यांना मारलं होतं...', प्रिन्स हॅरी यांच्या खुलाशाने जगभरात खळबळ

ट्विटरला गेल्या वर्षी जुलैमध्ये या त्रुटीबद्दल पहिल्यांदा कळले. तेव्हा हॅकर्सनी 5.4 मिलियन ट्विटर हँडल, ईमेल आणि फोन नंबर विकले. जानेवारी 2022 मध्ये बग रिपोर्ट्ससाठी त्याच्या बाउंटी प्रोग्रामद्वारे डेटा भंगाची माहिती मिळाली. आयर्लंडच्या डेटा प्रोटेक्शन कमिशनने गेल्या महिन्यात दिलेल्या निवेदनानुसार, युरोपियन युनियनचे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन मोडले जाऊ शकते.

आयर्लंडच्या डेटा प्रोटेक्शन कमिशनने सांगितले की ते 5.4 दशलक्ष ट्विटर युजर्स डेटाच्या उल्लंघनाची चौकशी केली जात आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार जुलैपर्यंत, ट्विटरचे दैनिक सक्रिय वापरकर्ते 237.8 मिलियन इतके होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 2021 मध्ये असे ट्विटरची एक सेवा, ज्याला ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस किंवा API म्हणून ओळखले जाते, ते सदोष असल्याचे आढळले. ट्विटर युजरचे नाव ईमेलशी जुळण्याची क्षमता हाय-प्रोफाइल व्यक्तींसाठी चिंताजनक ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com