Nepal: ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे माउंट एव्हरेस्टवर दोन गिर्यारोहकांचा मृत्यू

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) चढताणा दोन परदेशी गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) चढताणा दोन परदेशी गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. यातील एक 41 वर्षीय अब्दुल वराइच हा एक स्विस नागरिक आहे आणि दुसरे 55 वर्षीय पुवेई ल्यूक अमेरिकन होते. ऑक्सिजनच्या (Oxygen) कमतरतेमुळे दोघांच्या मृत्यू झाला आहे. या दोन्ही गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी अतिरिक्त मदतही पाठविण्यात आली होती. पर्वतारोहण आयोजित करणार्‍या कंपनीच्या माहितीनूसार स्वित्झर्लंडमधील (Switzerland) वरीच हे एव्हरेस्ट जिंकल्यानंतर परत येत असताना मरण पावले. अमेरिकन गिर्यारोहक ल्यू शिखरावर पोहोचू शकले नाहीत.(Two climbers die due to lack of oxygen on Mount Everest)

अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्डच्या लसीला WHO ची मान्यता 

1953 मध्ये एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी पहिल्यांदाच एव्हरेस्ट गाठले. त्यानंतर आतापर्यंत सहा हजार गिर्यारोहक येथे पोहोचले आहेत. आतापर्यंत एव्हरेस्ट मोहिमेमध्ये सामील झालेल्यांमध्ये 311 गिर्यारोहक मृत्यूमुखी पडले आहेत. नेपाळने यावेळी पर्वतारोहणासाठी 408 परवाणग्या दिल्या आहेत.माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वत रांगेतील या शिखराची उंची 8848.46 मीटर इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. दरवर्षी जगभरातून गिर्यारोहकांची एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा असते. परंतू, मागच्या वर्षी नेपाळ सरकारने कोरोनाच्या परिस्थितीमूळे गिर्यारोहणाला परवाणगी दिली नव्हती.

‘’कोरोनाला रोखता आलं असतं पण... आंतराष्ट्रीय तज्ञांच्या गटानं ओढले ताशेरे!    

जॉर्ज मॅलरी यांने 1921 मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला होता. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग नेमके आहेत ही पडताळण्याची मोहिम होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या टोकापर्यंत  पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोलवर पाऊल ठेवले होते. नॉर्थ कोलवरून पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी मॅलरी  केली होती. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून मागे फिरावे लागले होते.

संबंधित बातम्या