बायडेन मंत्रिमंडळात दोन भारतीय?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या मंत्रिमंडळात दोन खाती भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे येण्याची शक्‍यता आहे. आरोग्य मंत्री म्हणून महाशल्यविशारद डॉ. विवेक मूर्ती, तर उर्जा मंत्री म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण मजुमदार यांच्या नावांची चर्चा आहे. तसे वृत्त काही प्रमुख प्रसार माध्यमांनीही दिले आहे.

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या मंत्रिमंडळात दोन खाती भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे येण्याची शक्‍यता आहे. आरोग्य मंत्री म्हणून महाशल्यविशारद डॉ. विवेक मूर्ती, तर उर्जा मंत्री म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण मजुमदार यांच्या नावांची चर्चा आहे. तसे वृत्त काही प्रमुख प्रसार माध्यमांनीही दिले आहे.

मूर्ती ४३ वर्षांचे असून कोरोना सल्लागार मंडळाचे संयुक्त अध्यक्षपद त्यांच्याकडे यापूर्वीच सोपवण्यात आले आहे. मजुमदार हे मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील तज्ज्ञ आहेत. ते ‘ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्‍ट्‌स एजन्सी-एनर्जी’ या संस्थेचे पहिले संचालक आहेत. या दोघांनी ट्रम्प यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे.मजुमदार एसएलएसी संस्थेच्या फोटॉन सायन्स खात्यात व्याख्याता होते. त्यांची नियुक्ती बराक ओबामा यांनी केली होती.

अधिक वाचा : 

दलाई लामा निवडीचा अधिकार चीनला नाही

डिचोलीत कोरोना नियंत्रणात 

जवानांना मिळणार उबदार निवासस्थाने

संबंधित बातम्या