गाझावर हल्ला करणाऱ्या इस्त्रायलच्या टीममध्ये दोन गुजराती बहिणी

गाझावर हल्ला करणाऱ्या इस्त्रायलच्या टीममध्ये दोन गुजराती बहिणी
armye.jpg

मागील काही दिवसांपूर्वी इस्त्रायल-पॅलेस्टाईन (Israel V/s Palestine) मधील युध्द हा जगभरात चर्चेचा विषय होता. ज्यामध्ये इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टाईनच्या अनेक भागांवर बॉम्बस्फोट केले. इस्त्रायली सैन्य हे जगातील अधिक धोकादायक सेना मानली जाते. या इस्त्रायलच्या सैन्यामध्ये (Israeli forces) मुळ गुजरातच्या (Gujarat) असलेल्या दोन बहिणी (Two sisters) आहेत. ज्यामध्ये इस्त्रायलच्या सैन्यात आपली सेवा बजावत आहेत. 

मूळ गुजरात राज्यातील जुनागड(Junagadh) जिल्ह्यातील मानवदार तहसीलमधील कोठडी नावाच्या छोट्या गावातील माहेर कुटुंब सध्या इस्त्रायलमध्ये निवासी आहेत. त्या ठिकाणी त्यांचे किराणा दुकान आहे. जगातील शक्तिशाली इस्त्रायलच्या सैन्यात या कुटुबांतील दोन्ही मुलींनी स्थान मिळवले. मुळ कोठाडी गावाचे रहिवासी जीवाभाई मुलयासिया (Jivabhai Mulayasia) आणि त्याचा भाऊ सावदासभाई मुलीसिया (Savdasbhai Mulisia) हे दोघेही तेल अवीव (Tel Aviv) येथे स्थायीक झाले आहेत. इस्त्रायली सैन्यात त्यांच्या मुली निशा (Nisha) आणि रिया (Rhea) सेवा बजावत आहेत. सध्या इस्त्रायली सैन्याच्या कम्युनिकेशन्स आणि सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये (Security Department) तसेच हेडलाईन फ्रंटलाइन युनिटमध्ये काम करत आहेत.  (Two Gujarati sisters in the Israeli team that attacked Gaza)

तसेच रियानेही बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इस्त्रायलच्या सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला होता. ती सध्या इस्त्रायलच्या प्री-सर्व्हिसमध्ये कार्यरत आहेत. जे इस्त्रायलच्या कमांडो ट्रेनिंगच्या बरोबरीने आहेत. तीन महिन्यांच्या अथक प्रशिक्षणानंतर आणि विविध परिक्षा क्लिअर केल्यानंतर तिला सैन्यामध्ये पोस्टिंग मिळाले. 

रिया आणि निशाचे वडिल म्हणाले, ''सैन्यातील 2.4 वर्षांपर्यंतचा कार्यकाळ संपल्यानंतर तिला पाच वर्ष किंवा दहा वर्षांच्या कालावधीसाठी करारावर स्वाक्षरी करावी लागेल, त्या काळामध्ये ती योग्यतेनुसार औषध, अभियांत्रिकी किंवा तिला आवडेल तो अभ्यासक्रम घेऊ शकेल. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च इस्त्रायल सैन्य उचलेल''

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com