दोन सख्या बहिणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, करायला निघाल्या DNA टेस्ट

वडील एकच आहेत आणि त्या दोघी बहिणी नात्यामध्ये आहेत.
दोन सख्या बहिणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, करायला निघाल्या DNA टेस्ट
RelationshipDainik Gomantak

एक कपल गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. नात्यामध्ये एकमेकांना डेट करणे यामध्ये काय नवल? पण आम्ही ज्या नात्याबद्दल सांगत आहोत त्यामध्ये जोडप्याला डीएनए चाचणी करावी लागणार आहे. कारण या जोडप्याला वाटते की त्यांचे वडील एकच आहेत आणि त्या दोघी बहिणी नात्यामध्ये आहेत. तर या समलिंगी जोडप्याने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे. (Two sisters in a live-in relationship set out to perform DNA tests)

Relationship
Russia Ukraine War: दिल्लीपेक्षा लहान असणाऱ्या या देशाने रशियाला दिली टक्कर

हे जोडपे टिकटॉकवर कार्ली आणि मर्सिडीज म्हणून सुप्रसिद्ध आहे. या जोडप्याचे टिकटॉकवर अर्धा दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अलीकडेच जोडप्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या जो़डप्याने डीएनए चाचणी करून घ्यायची असल्याचे सांगून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. कारण त्या दोघी बहिणी असल्याचा संशय त्यांना आहे.

कार्ली आणि मर्सिडीजने सांगितले की, त्यांच्या दोन्ही आई एकाच व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. अशा परिस्थितीत त्या नात्यामध्ये बहिणी झाल्या. मात्र, ही गोष्ट त्यांना डेट केल्यानंतर कळली आहे. त्यामुळेच त्यांना आता डीएनए चाचणीद्वारे खरे खोटे जाणून घ्यायचे आहे.

Carly आणि Mercedes च्या या TikTok व्हिडिओला 5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमधील त्या दोघींच्या बोलण्याला आणि त्यांच्या कृत्याला मजेदार म्हणत आहेत. त्या दोघींचे वडील एकच व्यक्ती आहेत का हे तपासण्यासाठी त्या दोघी आता डीएनए टेस्ट करणार आहेत.

या व्हिडीओमध्ये हे जोडपे त्यांच्या चाहत्यांना विचारतात की, त्या टेस्टमध्ये बहिणी असल्यातर त्यांनी वेगळे व्हावे का? रिलेशनशिपमध्ये राहणे चुकीचे आहे का? यावर सर्व युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हटलं की हा सगळा विनोद वाटतोय, तर एक व्यक्ती म्हणाली की दोघींचा चेहरा अगदी सारखाच आहे, तुम्ही बहिनीच आहात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com