UK: ब्रिटनचे खासदार अडकले चिनी हेराच्या जाळ्यात!

माजी ब्रिटिश खासदाराशी त्या महीलेचे जवळचे संबंध असल्याचे मत ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने व्यक्त केले. क्रिस्टीन ली नावाच्या चीनच्या या महिलेवर गुप्तचर यंत्रणा नजर ठेवत असल्याचे एमआय-5चे म्हणणे आहे.
Christine Lee
Christine LeeDainik Gomantak

MI-5 या ब्रिटनच्या गुप्तचर संस्था ने चीनमधील एका महिला गुप्तहेरबाबत ब्रिटनच्या नेत्यांना इशारा दिला. ब्रिटन येथे झालेल्या लेबर पार्टीला देणगी देणारी महिला ही चीनची गुप्तहेर असल्याचे मत MI-5 या ब्रिटनच्या गुप्तचर संस्था ने व्यक्त केले आहे. त्यांच्यावर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तसेच माजी ब्रिटिश खासदाराशी त्या महीलेचे जवळचे संबंध असल्याचे मत ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने व्यक्त केले. क्रिस्टीन ली नावाच्या चीनच्या या महिलेवर गुप्तचर यंत्रणा नजर ठेवत असल्याचे एमआय-5चे म्हणणे आहे.

ब्रिटीश संसदेच्या अध्यक्षांच्या संसदीय सुरक्षा पथकाने या संदर्भात वेस्टमिन्स्टरमधील सर्व खासदार आणि सहकाऱ्यांना संदेश पाठवला. त्यात सांगण्यात आले आहे की क्रिस्टीन ली या चीन (china)च्या आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेड फ्रंट अफेयर्स डिपार्टमेंटच्या वतीने जाणूनबुजून राजकीय हस्तक्षेप करते. ब्रिटीश गुप्तचरांनी सांगितले की या चीनी गुप्तहेरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच तीला सध्या देशातून बाहेर काढले नाही. तसेच असेही स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंत कोणत्याही ब्रिटीश राजकारण्याचा गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आलेला नाही.

Christine Lee
रशिया-भारत S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला अमेरिकन कायदेतज्ञांचा विरोध

लिबरल डेमोक्रॅट ला देणगी दिली

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लेबर पार्टी व्यतिरिक्त, चिनी गुप्तहेरने 2013 मध्ये ऊर्जामंत्री एड ड्यूई यांना 2005 मध्ये 5,000 पाउंड दान केले. ली यांचे कंझर्व्हेटिव्ह पार्टी यूकेशीही संबंध आहेत. डेव्हिड कॅमेरॉन देशाचे पंतप्रधान असताना ती अनेक वेळा भेटली. केवळ ब्रिटनमध्येच (Britain) नव्हे तर अमेरिका, फ्रान्स आणि नेदरलँडमध्येही चिनी हेर मोठ्या प्रमाणात आहेत. फ्रान्सने 2011 मध्ये असाच इशारा दिला होता. त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात आपले हेर पाठवत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Christine Lee
जर रशिया किंवा चीनशी युद्ध झाले तर... अमेरिकन जनरलने दिला इशारा

चिनी गुप्तहेरांचे लंडनमध्ये वास्तव्य

क्रिस्टीन ली हि सध्या लंडन येथे वास्तव्यास आहे आणि लंडनमधील चिनी दूतावासात मुख्य कायदेशीर सल्लागारही राहिलेली आहे. ती सध्या ओव्हरसीज चायनीज अफेयर्स या कार्यालयाच्या कायदेशीर सल्लागार आहेत. तसेच ली ह्या वेस्टमिन्स्टरमधील इंटर-पार्टी चायना ग्रुपचे सेक्रेटरी आहेत. लेबर पार्टीचे नेते जेरेम कॉर्बिन यांचे सहकारी बॅरी गार्डिनर यांना एका चिनी गुप्तहेराने 5,00,000 पाउंड पेक्षा जास्त देणगी दिली आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी अशाप्रकारे त्यांच्या देणगीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, मात्र कारवाई झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com