UK Woman: डॉक्टर भेटला नाही म्हणून महिलेने स्वत:च उखडले 13 दात

शासकिय दवाखाना बंद, खाजगी उपचार परवडत नसल्याने उचलेले पाऊल
UK women pulled out 13 of her own teeth
UK women pulled out 13 of her own teeth Dainik Gomantak

युनायटेड किंगडम (United Kingdom) मधील एका महिलेलला दातांच्या उपचारासाठी वेळेवर डॉक्टर (Dentist) भेटला नाही. वेदनेला कंटाळलेल्या या 42 वर्षीय महिलेने अखेर स्वत:चे 13 दात उखडून काढले आहेत. डॅनिएल वॉट्स असे या महिलेचे नाव असून, तिला हिरड्यांचा जुनाट आजार आहे. डेली स्टारने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

UK women pulled out 13 of her own teeth
Joshua Peter De Souza : गोवा विधानसभा उपसभापतीपदी ज्योशुआ डिसुझा यांची निवड

डॅनिएल वॉट्स या महिलेला हिरड्यांचा जुनाट आजार आहे. दातांच्या उपचारासाठी महिलेला स्थानिक दंतचिकित्सक (National Health Service) मिळाला नाही. वेदनेने असहाय झालेल्या महिलेने अखेर तिचे 13 उखडून काढले आहेत. खाजगी उपचार परवडत नसल्याने शासकिय उपचाराच्या शोधात महिला होती. पण महिलेच्या रहिवासी भागात असलेला शासकिय दवाखाना मागील सात वर्षापासून बंद आहे. असे डेली स्टारच्या बाबतमीत म्हटले आहे.

वॉट्स बरी सेंट एडमंड्स येथील मूळ रहिवासी आहेत. वॉट्स यांचे आता केवळ 14 दात शिल्लक आहेत. दातांतील गॅप लपवण्यासाठी वॉट्स हसणे टाळतात असे त्यांनी डेली स्टारला सांगितले. वॅट यांची ही व्यथा सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल झाली आहे.

UK women pulled out 13 of her own teeth
ऋषि सुनक यांना मोठा धक्का बसणार? लिज ट्रस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com