Russia Ukraine War: युक्रेनच्या वैमानिकाने सांताक्लॉजच्या वेशात विमानातून डागली क्षेपणास्त्रे...

व्हिडिओ व्हायरल; सांताला देखील रशियाला पराभूत करायचे असल्याच्या लोकांच्या प्रतिक्रीया
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये जवळपास 300 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. ख्रिसमस काळातही रशियाने युक्रेनवर एकूण 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. युक्रेनच्या सैनिकही रशियाला चोख प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सांताक्लॉजच्या वेशभूषेत युक्रेनच्या सैनिकाने रशियावर क्षेपणास्त्रे डागली.

Russia Ukraine War
NASA Chief on China: नासाच्या प्रमुखांना चीनबाबत वाटतेय ही भीती; चीनी चांद्रमोहिमेबाबत दिला इशारा...

हा व्हिडिओ युक्रेनच्या लष्कराने आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. युक्रेनच्या या फायटर पायलटने MIG-29 ने हल्ला केल्याचे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या पायलटने अमेरिकन मिसाईल AGM-88 HARM ने रशियावर हल्ला केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स विविध प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, या सांतासमोर कोणीही टिकू शकत नाही. अनेक युजर्स या युद्धाच्या समाप्तीसाठी शुभेच्छा देतानाही दिसले. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रशियाने युक्रेनवर ड्रोनने हल्ला करण्यास सुरुवात केली. रशियन सैनिकांनी कीव शहराला लक्ष्य केले आहे.

Russia Ukraine War
Pakistan: मोठा खुलासा, पाकचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा हिरोइन्ससोबत करायचे 'सेक्स'

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरवातीला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. नववर्षाच्या निमित्तानेही दोन्ही देशांनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे कीव शहरात विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक भागात वीजपुरवठा बंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com