Ukraine: जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी युक्रेनियन महिला करतायेत न्यूड फोटोशूट

Russia-Ukraine War: अनेक महिने चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप निर्णय झालेला नाही.
Ukrainian Women
Ukrainian WomenDainik Gomantak

Russia-Ukraine War: अनेक महिने चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु जेव्हापासून युध्द सुरु झाले, तेव्हापासून अनेक प्रकारच्या कथा समोर आल्या आहेत. दरम्यान, आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. युक्रेनियन महिला आपल्याच देशाच्या सैनिकांना न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर हे सर्व नियोजनानुसार होत आहे. जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी हे केले जात असल्याचे सांगण्यात आले.

या योजनेअंतर्गत हे सर्व घडत आहे

वास्तविक, हे सर्व रशियाच्या (Russia) बलाढ्य सैन्याविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी केले जात आहे. टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात याला दुजोरा दिला आहे. रिपोर्टनुसार, युक्रेनियन महिला (Women) रशियन सैन्याशी लढणाऱ्या सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचे न्यूड फोटो पाठवत आहेत. यासाठी टेलिग्राम या सोशल मीडिया साईटवर एक चॅनल तयार करण्यात आला असून त्यामध्ये महिलांचे फोटो शेअर केले जात आहेत.

Ukrainian Women
Russia-Ukraine War: युक्रेनची शार्प शूटर थालिता डो रशियन रॉकेट हल्ल्यात ठार

हे संपूर्ण प्रकरण कीवमधील एका गटाकडून सुरु आहे

डेलीस्टरने आपल्या एका रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की, हे सर्व युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv) बसलेल्या एका गटाकडून केले जात आहे. त्या ग्रुपमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून महिलांचे असे फोटो आणि व्हिडिओ येत आहेत. यानंतर, ते सैनिकांच्या मोबाइलवर पाठवले जात आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता, जो आता उघड झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com