अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या डी-कंपनीवर कारवाई सुरूच; दोन गुंडांना अटक

पाकिस्तानात लपून बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशतवादी संघटना डी-कंपनीविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा कारवाई सुरू आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या डी-कंपनीवर कारवाई सुरूच; दोन गुंडांना अटक
Dawood IbrahimDainik Gomantak

पाकिस्तानात (Pakistan) लपून बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) दहशतवादी संघटना डी-कंपनीविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) कारवाई सुरू आहे. एनआयएकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात दहशतवादी कारवाया, तसेच मोठ्या रकमेची अवैध वसुली आणि अंमली पदार्थांची तस्करी याविरोधात छापेमारी सुरू केली आहे. या संदर्भात तपास यंत्रणेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, आरिफ शेख आणि शब्बीर शेख या दोन गुंडांना अटक केली. हे दोघेही बेकायदेशीर अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर वसुली आणि टेरर फंडिंगमध्ये सामील असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोघांना शुक्रवारी कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Underworld don Dawood Ibrahim D Company continues to be prosecuted Two goons arrested)

एनआयएचे मुंबईत छापे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने 9 मे रोजी डी कंपनीशी संलग्न रिअल इस्टेट मॅनेजर, ड्रग्ज तस्कर आणि अवैध खंडणी तसेच शार्प शूटरमध्ये गुंतलेल्या तस्करांवर देखील याआधी छापा टाकला होता. यादरम्यान बोरीवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव आणि परळ परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली आहे. ज्या प्रकरणात आधी एनआयएने छापा टाकला होता, आणि त्याच प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या तुरुंगात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार डी कंपनीवर केला गुन्हा दाखल

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशतवादी संघटना डी कंपनीविरोधात याआधी गुन्हा दाखल केला होता. डी कंपनीवर गुन्हा दाखल केल्यानंतर तपास यंत्रणेने छापा टाकून शोधमोहीम सुरू केली आहे. या संदर्भात त्यांनी या प्रकरणाशी संबंधित इतर महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठी दाऊदच्या दोन साथीदारांना अटकेत घेतले आहे.

गृहमंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये एनआयएकडे जबाबदारी सोपवली होती.

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमची दहशतवादी संघटना डी कंपनी 2003 मध्येच संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट केली होती आणि यानंतर भारतासह संयुक्त राष्ट्रांनीही त्यावर बंदी घातली होती. याआधीच गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्येच डी कंपनीविरोधात चौकशीची जबाबदारी सोपवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.