United Nations: जगभरात 10 करोड लोक झाले विस्थापित; जाणून घ्या कारण?

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे.
United Nations: जगभरात 10 करोड लोक झाले विस्थापित; जाणून घ्या कारण?
DisplacedDainik Gomantak

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, हवामान बदल आणि नैसर्गित आपत्तींमुळे 2021 मध्ये जगभरात 100 दशलक्षाहूंन अधिक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित झाले आहेत. भारतात ही संख्या सुमारे 50 लाख आहे. याचा अर्थ, भारतातील 50 लाखांहून अधिक लोक या वर्षी आपले घर सोडून विस्थापित आहेत.

दरम्यान, यूएन रिफ्युजी एजन्सीच्या वार्षिक 'ग्लोबल ट्रेंड्स रिपोर्ट'नुसार, गेल्या वर्षी एवढ्या मोठ्या विस्थापनाची कारणे हिंसा, मानवी हक्कांचे उल्लंघन, अन्न असुरक्षितता, हवामान संकट, युक्रेनमधील युद्ध आणि आफ्रिकेपासून अफगाणिस्तानपर्यंतच्या (Afghanistan) इतर आपत्कालीन परिस्थिती आहेत.

Displaced
United Nations: 'गृहयुद्धा' पासून मुक्ती मिळवणं हेच म्यानमारचं उद्दिष्ट!

चीनमधील सर्वाधिक विस्थापित लोक

अहवालानुसार, 2021 मध्ये चीनमध्ये (China) सर्वाधिक 6 दशलक्ष, फिलिपाइन्समध्ये 5.7 दशलक्ष आणि भारतात 4.9 दशलक्ष लोक आपत्तींमुळे विस्थापित झाले होते. या आपत्तीमुळे बहुतेक लोक तात्पुरते घर सोडून गेले होते. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, अंतर्गत विस्थापितांपैकी बहुतेक लोक त्यांच्या घरी परतले आहेत, परंतु वर्षाच्या अखेरीस, जगभरातील आपत्तींमुळे विस्थापित 5.9 दशलक्ष लोक अजूनही त्यांच्या घरी परत येऊ शकले नाहीत.

Displaced
United Nation: जगात बालकामगारांची वाढती संख्या चिंताजनक; अहवालातून मोठा खुलासा

विस्थापितांची संख्या दरवर्षी वाढत आहे

यूएन एजन्सीने म्हटले आहे की, गेल्या दशकात प्रत्येक वर्षी घरे सोडण्यास भाग पाडलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. 2021 च्या अखेरीस, युद्ध, हिंसाचार, छळ आणि मानवी हक्कांच्या (Human Rights) उल्लंघनामुळे विस्थापित झालेल्या लोकांची संख्या 893 दशलक्ष होती, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वाढली असून 10 वर्षांपूर्वीच्या आकड्यापेक्षा दुप्पट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com