युनायटेड एअरलाइन्सची उड्डाणे उद्यापासून सुरू

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

भारत आणि अमेरिकेतून प्रवास करणाऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी आहे. युनायटेड एअरलाइन्सने रविवार (25 एप्रिल) पासून दिल्लीसाठी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतून प्रवास करणाऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी आहे. युनायटेड एअरलाइन्सने(United Airlines)रविवार (25 एप्रिल) पासून दिल्लीसाठी उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शनिवारी (24 एप्रिल) सकाळी याची घोषणा करण्यात आली.  शुक्रवारी (23 एप्रिल) दिल्ली विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांना कोरोना आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितले असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. एवढेच नाही तर ते प्रवाश्यांशिवाय विमान घेवून ते न्युयार्क ला परत गेले. त्यानंतर लगेच पुढील सूचना येईपर्यंत युनायटेड एअरलाइन्सने दिल्लीची सर्व उड्डाणे रद्द केली होती.

ग्राहकांना पर्यायी सेवा उपलब्ध करून देवू

“आम्हाला कोविड -19 च्या प्रवासाच्या नियमांबाबत भारताकडून स्पष्टीकरण हवे आहे. म्हणूनच आम्ही आमची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत आणि लवकरात लवकर आमच्या नियोजित सेवा पुन्हा सुरू करण्याची योजना आहे," असे युनायटेड एअरलाइन्सच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

तुर्कस्तानातील क्रिप्टोकरन्सी दिवाळखोरीत! 

युनायटेड ही एकमेव अमेरिकन विमानसेवा आहे जी सध्या दिल्ली ते न्युयार्क, सॅन फ्रान्सिस्को आणि शिकागो दरम्यान उड्डाण करणारे हवाई परिवहन आहे. तसेच एअर इंडिया ही एकमेव विमान सेवा आहे जी अमेरिकेतील न्यूयॉर्क जेएफके, नेवार्क, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन सारख्या ठिकाणी थेट उड्डाणे करते.

प्रवाशांना पाठविले संदेश

युनायटेड एअरलाइन्सने दिल्ली विमानतळावरून रिकामे विमान घेवून जाण्याचे कोणतेही कारण अधिकृतपणे दिले नाही. जेव्हा विमान उड्डाण रद्द करण्यात आले तेव्हा युनायटेड एअरलाइन्सने प्रवाशांना संदेश पाठविले आहे. "23 एप्रिल रोजी दिल्लीहून युनायटेड एअरलाइन्सची फ्लाईट रद्द करण्यात आली. कारण भारतीय अधिकाऱ्यांसोबत भारतात सुरू असलेल्या कोविड -१९ प्रवासी नियमांबाबत चर्चा करावी  लागणार आहे. आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा पर्यत्न करीत आहोत. ही समस्या लवकरच सोडविली जाईल." असे त्या संदेशात म्हटले आहे.

Oxgen Shortage: चीनने पुढे केला मदतीचा हात; भारताने मात्र... 

ज्यासाठी ते तयार नव्हते

युनायटेड एअरलाइन्सचे कर्मचारी आरटी-पीसीआर चाचणीसाठी तयार नव्हते
भारतातील कोरोना विषाणूची वाढती रूग्णसंख्या बघता केंद्र सरकारने परदेशी उड्डाणांसाठी नवे नियम जारी केले होते, त्याअंतर्गत सर्व एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर देण्याचे सांगण्यात आले होते. 
त्वरित रवाना होणाऱ्या फ्लाइट्सट कर्मचार्‍यांना चाचणी देण्यास सूट देण्यात आली असली तरी युनायटेड एअरलाइन्सची फ्लाइट्स रिकामी परत गेली होती. याचा अर्थ असा होता की क्रू आणि स्टाफला विमानातून उतरून विमानतळाबाहेर पडावे लागले असते. अशा परिस्थितीत त्यांना चाचणी घ्यावी लागेली असती, ज्यासाठी ते तयार नव्हते.

संबंधित बातम्या