United Nation: जगात बालकामगारांची वाढती संख्या चिंताजनक; अहवालातून मोठा खुलासा
lebar 1.jpg

United Nation: जगात बालकामगारांची वाढती संख्या चिंताजनक; अहवालातून मोठा खुलासा

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International Labor Organization) आणि युनायटेड नेशन्स चाइल्ड फंड (United Nations Child Fund) यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रसिध्द केलेल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. गुरुवारी हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. 12 जून रोजी बाल कामगारविरुध्द (Child labor) दिनाच्या आगोदर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. मागील दोन दशकात पहिल्यांदाच बालकामगारांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली आहे. या अहवालानुसार जगभरात बालकामगारांची संख्या तब्बल 160 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. मागील चार वर्षामध्ये सुमारे 40 लाख नवे बालमजूर जोडले गेले आहेत. सध्या कोरोना (Covid19) महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लहान मुलांच्या जीवाला धोका पोहोचलेला आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. युनिसेफ (UNICEF) आणि आयएलओ (ILO) ने हा अहवाल ''Child Labour: Global estimates 2020, trends and the road forward' या नावाने प्रसिध्द केला आहे.

युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर (Henrietta Four) यांनी या अहवालाचे वर्णन करताना म्हटले की, ''या अहवालामधून जागतिक बॅकेला आवाहन करण्यात आले असून त्यांना जे सध्या लहान मुले बालकामगार म्हणून काम करत आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे. तसेच या अहवालामध्ये जगभरातील देशांच्या सरकारांनाही त्यांच्या त्यांच्या देशामध्ये बालकांसाठी सामाजिक सुरक्षा कार्यक्रम चालविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरुन आपल्या कुटुंबातील लहान मुलांना बालमजुरी करण्यासाठी पाठविण्याची गरज भासू नये.'' 

या अहवालात प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, 5 ते 17 वयोगटातील बालमजुरी करणाऱ्यांची संख्य़ा  2016 पासून आत्तापर्यंत वाढतच चालली आहे. आयएलओचे महासंचालक गाय रायडर याअहवालात समाविष्ट केलेली आकडेवारी जगाला चेतावणी देणारी आहे. ही आकडेवारी दर्शवते की, मुलांची आणखी एक पिढी मोठ्या धोक्याचा सामना करत आहेत.

पुढे या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षामध्ये आफ्रिकेतील (Africa) सब-सहारामध्ये(Sub-Sahara) 1.5 कोटीहून अधिक मुले बालमुरीची बळी ठरली आहेत. वाढत्या साथीच्या आजारामुळे लॅटिन अमेरिका,(America) आशिया पॅसिफिक (Asia Pacific) आणि कॅरिबियन देशांमध्येही होणारी प्रगती हीआड आलेली आहे. साथीच्या आजारामुळे 2022 च्या अखेरीस अतिरिक्त 90 लाख बालकांना बालकामगारात ओढले जाऊ शकतात, अशी चेतावणी या अहवालाच्या माध्यमनातून देण्यात आली आहे.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com