अमेरिकेने रोखला दहशतवाद्यांचा निधी ; पाकिस्तानच्या 'लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद'चा समावेश

PTI
शनिवार, 2 जानेवारी 2021

अमेरिकेने परकी दहशतवादी संघटनांच्या नाड्या आवळायला सुरवात केली असून पाकिस्तानातील लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद आदी दहशतवादी संघटनांचा ६३ दशलक्ष डॉलरचा निधी रोखण्यात आला आहे. ​

वॉशिंग्टन :  अमेरिकेने परकी दहशतवादी संघटनांच्या नाड्या आवळायला सुरवात केली असून पाकिस्तानातील लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद आदी दहशतवादी संघटनांचा ६३ दशलक्ष डॉलरचा निधी रोखण्यात आला आहे. अमेरिकेने   २०१९ मध्ये म्हणजे केवळ एका वर्षात ही कामगिरी केल्याचे अर्थ विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात ही बाब उघड झाली.

ट्रेजरी विभागाचे काम
अमेरिकेने प्रामुख्याने पाकिस्तानातील संघटनांना लक्ष्य केले असून हरकत-उल- मुज्जाहिद्दीन या संघटनेचे मूळ काश्‍मीरमध्ये असले तरीसुद्धा या संघटनेच्या कारवाया भारताबाहेर देखील सुरू असतात. अमेरिकेच्या ट्रेजरी विभागाअंतर्गत येणारे ऑफिस 
ऑफ फॉरेन ॲसेट कंट्रोल हे दहशतवादी संघटनांना होणारा अर्थपुरवठा निश्‍चित करून तो रोखण्याचा प्रयत्न करते.

सत्तर संघटनांवर कारवाई
या अहवालानुसार अमेरिकेने २०१९ मध्ये जगातील जवळपास ७० दहशतवादी संघटनांचा ६३ दशलक्ष डॉलरचा निधी खला आहे. पूर्वापारपासून अमेरिकेच्या हिटलिस्टवर असणाऱ्या अल-कायदाचा सर्वाधिक म्हणजे ३.९ दशलक्ष डॉलर एवढा निधी रोखण्यात आला. तत्पूर्वी २०१८ मध्ये या संघटनेचा ४६ दशलक्ष डॉलर एवढा निधी याआधीच रोखला होता.

तमिळ टायगरवर निशाणा
श्रीलंकेमध्ये लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (एलटीटीई) या संघटनेचाही अमेरिकेने ५८०,८११ डॉलरचा निधी रोखला आहे. २०१८ आणि १९ मध्ये या निधीचे प्रमाण तेवढेच असल्याचे दिसून आले.  

संबंधित बातम्या