गांजा तर औषध!; संयुक्त राष्ट्रसंघाने धोकादायक ड्रग्सच्या यादीतून वगळले, भारतानेही केलं समर्थन

गोमंतक ऑनलाईन टीम
शनिवार, 5 डिसेंबर 2020

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक अंमली पदार्थांच्या यादीतून वगळले आहे. 

 नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंमली पदार्थ आयोगाने घेतलेल्या ऐतिहासिक मतदानानंतर गांजाला धोकादायक अंमली पदार्थांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थ आयोगाने गांजाला धोकादायक अंमली पदार्थांच्या यादीतून वगळले आहे. 

या प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांचे मतदान घेण्यात आले. यात 27  देशांनी गांजाला या यादीतून वगळण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. यात भारताचाही समावेश असून भारतात गांजा हे प्रतिबंधित अंमली पदार्थ असले तरी भारताने समर्थनात मतदान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, चीन, रशिया आणि पाकिस्तान या देशांनी गांजा हे धोकादायक अंमली पदार्थ असल्याचे म्हणत विरोधात मतदान केले आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाने घेतलेल्या या निर्णयानंतर गांजापासून निर्मिती झालेल्या औषधांचे प्रमाण वाढू शकते. औषधी वनस्पती म्हणून गांजाच्या वैज्ञानिक संशोधनासाठी या निर्णयामुळे चालना मिळणार आहे. गांजाच्या समर्थनार्थ मतदान केलेल्या अनेक देशांना आपल्या ड्रग्स पॉलिसीमध्ये यानंतर बदल करावे लागणार आहेत. भारतालाही यात बदल करून देशात गांजाला वैद्यकीय वापरासाठी परवानगी देण्याबाबतचे नवीन नियम करावे लागणार आहेत. अमेरिका, उरूग्वे आणि कॅनडात याआधीच गांजाला वैद्यकीय वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांतील एकूण 50हून जास्त देशांनी गांजाचा वैद्यकीय फायदा जाणून आपापल्या देशांमध्ये वैध ठरविले आहे. 
 

संबंधित बातम्या