म्यानमारमध्ये लष्करांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अमेरिकेने दिला इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

म्यानमारमध्ये  नागरी  शासन  आणि  लष्कर  याच्यांत निर्माण  झालेला  तणाव  हा  वाढत  गेला.

नवी दिल्ली: म्यानमारमध्ये  लष्करांनी  जबरदस्तीने  सत्ता  ताब्यात  घेतल्यानंतर यावर  अमेरिकेने म्यानमार  लष्करांना  लोकशाहीवादी  नेत्या  आंग  सान  सू  की   यांच्यासह  ताब्यात घेतलेल्या  अधिकाऱ्यांना  त्वरित  सोडावे  असा  इशारा  दिला  आहे. म्याननमारमध्ये  नोव्हेंबरमध्ये  निवडणूका  पार  पडल्या  होत्या. मात्र  म्यानमारमध्ये  नागरी  शासन  आणि  लष्कर  याच्यांत निर्माण  झालेला  तणाव  हा  वाढत  गेला.  आणि  अखेर  म्यानमार  लष्करांनी लोकशाहीवादी  नेत्या  अणि  त्यांच्या  सहकार्य़ांना  अटक  केली.  ''म्यानमारच्या  लोकशाही  प्रक्रियेत  अडथळा आणणाऱ्यास  आमचा  विरोध  आहे. मनमानी  पध्दतीने  शासन  हाती घेण्याला  अमेरिकेचा  विरोध  असणार  आहे. आणि  या  सगळ्या  प्रकारास  जबाबदार असणाऱ्यावर  आम्ही  कारवााई  करु ''असा इशारा अमेरिकेच्या व्हाइट हाऊस प्रवक्त्या जेन साकी  यांनी  दिला  आहे.

डब्ल्यूएचओच्या पथका कडून हुबेईतील सी फूड मार्केटला भेट; इथूनच झाला होता... 

''म्यानमारमधील  लष्करांना  आणि  लोकशाही  पक्षांना  आम्ही  लोकशाही  नियमांचे  पालन करण्याची  आणि  ताब्यात  घेतलेल्या  लोकशाहीवादी  नेत्यांना  लवकरात  लवकर  सोडावे अशी  विनंती  करतो आहोत'' असे  जेन  साकी  यावेळी म्हणाल्या. एनएलडी पक्षाने  म्यानमारमध्य़े  पार  पडलेल्या  निवडणूकीत  अगदी  सहजपणे विजय  मिळवला  होता. मात्र  या  निवडणूकामध्ये  घोटाळा  झाला  असल्याच्या   कारणाने  नागरी  शासन  आणि लष्करांमध्य़े  तणाव  निर्माण  झाला  होता. याचा  फायदा  घेत  म्यानमारमधील  लष्करांनी नागरी  सरकार  उलथवून शासनाची  सूत्रे आपल्या  हाती  घेतली  आहेत. म्यानमारमध्ये   2015  मध्ये  पार  पडलेल्या   राष्ट्रीय  निवड़णूकामध्ये  विजय  मिळवत लोकशाहीवादी  नेत्य़ा आंग  सान  सू  की  या   सत्तेत  आल्या  होत्या. मात्र  रोहि्ंग्याच्या मुद्दयावरुन  त्यांची  प्रतिमेला  तडा  गेला  होता. 

संबंधित बातम्या