यूएन’च्या आमसभेचे अधिवेश होणार आभासी

PTI
शुक्रवार, 24 जुलै 2020

कोरोनामुळे ध्वनिमुद्रित भाषण पाठविण्याचे आवाहन

वॉशिंग्टन

कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे सप्टेंबर महिन्यात होणारे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आम सभेचे अमृत महोत्सवी अधिवेशन यंदा वेगळे ठरणार आहे. १९३ सदस्य देशांच्या आम सभेच्या या अधिवेशनाला सर्व प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसून ध्वनिमुद्रित केलेले भाषण पाठविणार आहे. ‘यूएन’च्या ७५ वर्षांच्या इतिहासात असे आभासी अधिवेशन प्रथमच होणार आहे.
‘यूएन’च्या आमसभेचे ७५ वे अधिवेशन १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रत्येक अधिवेशनाच्या प्रारंभी चर्चासत्र होत असते. साधारणपणे एक आठवडा हे अधिवेशन चालते. आम सभेच्या वैशिष्टपूर्ण सभागृहातील व्यासपीठावरुन १९३ सदस्य देशांचे प्रमुख नेते किंवा मंत्री जगापुढे आपले विचार मांडतात. पण सध्या जगभरात कोरोनाचा कहर सुरू असल्याने अनेक देशांमध्ये प्रवासबंदी आहे. यामुळे अनेक देशांच्या प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत. यामुळे
सदस्य देश, निरीक्षक देश आणि युरोपीय सदस्य देशांचा मुख्य नेता, उपाध्यक्ष, युवराज किंवा युवराज्ञी आदी प्रतिनिधी ध्वनिमुद्रित केलेले भाषण पाठवून देऊ शकतो, असे आमसभेने बुधवारी (ता.२२) सांगितले. अधिवेशन काळात त्यांचे भाषण प्रसारित केले जाईल. ‘यूएन’च्या कायम सदस्य देशांचे प्रतिनिधी मात्र सभागृहात उपस्थित राहणार आहेत.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या