UPच्या शीख महिलेची USमध्ये आत्महत्या, मृत्यूपूर्वी पतीवर केले गंभीर आरोप

घरगुती हिंसाचारामुळे मुलीने आपले जीवन संपवले असल्याची माहिती वडिलांनी दिली आहे, व्हिडिओमध्ये ती पती आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप करत आहे.
UP Sikh woman dies by suicide in US
UP Sikh woman dies by suicide in US Dainik Gomantak

UP Sikh woman: यूपीच्या बिजनौरमध्ये राहणाऱ्या एका शीख महिलेने अमेरिकेत आत्महत्या केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेच्या मृत्यूचे कारण घरगुती हिंसाचार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर तेथील शीख समुदायाच्या लोकांनी सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला आहे. तेव्हापासून #justice for mandeep सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

मनदीप कौर असे या महिलेचे नाव असून तिच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. महिलेचे वडील जसपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या कथित घरगुती हिंसाचारामुळे मुलीने आपले जीवन संपवले असल्याची माहिती मिळाली आहे. मनदीप पती आणि दोन मुलींसोबत न्यूयॉर्कमध्ये राहत होती. दोन्ही मुली अमुक्रमे चार आणि सहा वर्षांच्या आहेत.

UP Sikh woman dies by suicide in US
India Vs China: 'नो फ्लाइंग झोनमध्ये घुसखोरी केल्यास...', भारताने ड्रॅगनला भरला दम !

या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. मृत्यूपूर्वी मनदीपने हा व्हिडिओ शूट केल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये ती पती आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप करत आहे. त्याचवेळी, या प्रकरणी नजीबाबाद पोलीस स्टेशन बिजनौरचे एसएचओ रवींद्र वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजोधच्या आई-वडिलांविरोधात हुंडा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएचओने सांगितले की, तिच्या पतीविरुद्ध न्यूयॉर्कमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

UP Sikh woman dies by suicide in US
Elon Musk: इलॉन मस्क यांचा ट्विटरवर फसवणुकीचा आरोप, प्रकरण कोर्टात दाखल

मनदीपचा विवाह आठ वर्षांपूर्वी बिजनौरमधील बडिया गावात राहणाऱ्या रणजोधसोबत झाला होता. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजोध हा न्यूयॉर्कमध्ये ट्रक ड्रायव्हर आहे. सुरुवातीला दोघेही दोन वर्षे गावात राहत होते आणि तिथेच एका मुलीचा जन्म झाला. दरम्यान, दोन वर्षातच दुसऱ्या मुलीचाही जन्म झाला. यानंतर मुलीचा छळ सुरू झाला. मात्र, कुटुंबीयांच्या मध्यस्थीने परिस्थिती थोडी सुधारली. पण नंतर दोघेही न्यूयॉर्कला जाऊन राहू लागले. मात्र तिथे परिस्थिती आणखी बिकट होत गेली. रणजोधमध्ये काहीच सुधारणा न झाल्याने मनदीपवरील अत्याचार वाढू लागले. दरम्यान, मनदीप कौरने आत्महत्या केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com