ISIS-K नेता 'सनाउल्लाह गफारी' वर अमेरिकेने 10 दशलक्ष डॉलर्सचा इनाम केला जाहीर

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (RFJ) ने सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली.
ISIS Ieader Sanaullah Ghaffari
ISIS Ieader Sanaullah GhaffariDainik Gomantak

ISIS-Khorasan (ISIS-K) चा म्होरक्या सनाउल्लाह गफारी (ISIS-K Terrorist Sanaullah Ghafari) आणि काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kabul Airport Bomb Attack) गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांशी संबंधित माहिती देण्यासाठी अमेरिकेने (America) 10 दशलक्ष डॉलर्सचा इनाम घोषित केला आहे. अमेरिकेच्या (America) डिपार्टमेंट ऑफ रिवॉर्ड्स फॉर जस्टिस (RFJ) ने सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार, "रिवॉर्ड्स फॉर जस्टिस ISIS-नेता शहाब अल-मुहाजिर, ज्याला सनाउल्लाह गफारी म्हणून ओळखले जाते, त्याच्याबद्दलची माहिती प्रदान करण्यासाठी US $ 10 दशलक्ष पर्यंतचे बक्षीस देऊ करत आहे." (US Announces 10 Million Rewards For Information leading To The Capture Of ISIS Ieader Sanaullah Ghaffari)

दरम्यान, 26 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची माहिती देण्यासाठीही हे बक्षीस असल्याचे निवेदनात म्हटले आहे. RFJ च्या मते, 1994 मध्ये अफगाणिस्तानमध्ये जन्मलेला गफारी हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा सध्याचा नेता आहे. संपूर्ण अफगाणिस्तानातील सर्व ISIS-K ऑपरेशन्ससाठी निधी मंजूर करणे आणि व्यवस्था करणे यासाठी जबाबदार असल्याचे विभागाने म्हटले आहे. काबूल (Kabul) विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस-के या अमेरिकेने बंदी घातलेल्या विदेशी दहशतवादी संघटनेने स्वीकारली असल्याचे आरएफजेने म्हटले आहे.

ISIS Ieader Sanaullah Ghaffari
'या' देशांमध्ये आधीच हिजाबवर बंदी अन्...

13 अमेरिकन सैनिकांसह 185 ठार

या हल्ल्यात 13 अमेरिकन सैनिकांसह 185 लोक मारले गेले, जे नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत करत होते. ISIS-K च्या केंद्रीय नेतृत्वाने जून 2020 मध्ये गफारीला संघटनेचा नेता म्हणून नियुक्त केले. "आयएसआयएसने गफारीच्या नियुक्तीबाबत केलेल्या घोषणेमध्ये त्याचे वर्णन एक अनुभवी लष्करी नेता आणि काबूलमधील ISIS-K च्या 'शहरी सिंहांपैकी एक' म्हणून केले आहे. जो गनिमी कारवायांव्यतिरिक्त अनेक जटिल आत्मघातकी हल्ल्यांमध्ये सामील आहे,"

गफारी हा ISIS-K चा सध्याचा नेता

RFJ ने देखील सोमवारी ट्विट करत म्हटले की, '10 दशलक्ष डॉलर्स पर्यंत बक्षीस द्या! सनाउल्लाह गफारी हा ISIS-K या दहशतवादी संघटनेचा सध्याचा म्होरक्या आहे. RFJ ला सिग्नल, टेलिग्राम, WhatsApp किंवा आमच्या टोर-आधारित टिप्स लाइनद्वारे सूचित करा. या दहशतवाद्याला पकडून देण्यासाठी मदत करा.'

ISIS Ieader Sanaullah Ghaffari
Ajab Gajab News: या देशांमध्ये अजब-गजब पद्धतीने साजरा होतो 'नाताळ सण'

RFJ ने पुढे म्हटले की, काबूल विमानतळावर आत्मघातकी हल्लेखोर आणि काही बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. अमेरिका आणि इतर देशांच्या सरकारांनी त्यांच्या नागरिकांना आणि असुरक्षित अफगाण लोकांना देशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी एक मोठी मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान या हल्ल्यात 18 अमेरिकन सैनिकांसह 150 हून अधिक लोक जखमी झाले. अफगाणिस्तानातील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूल ताब्यात घेत संपूर्ण देशावर कब्जा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com