'पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात अमेरिकेचा गौप्यस्फोट'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

जमाल खाशोगी वॉशिंग्टन पोस्टसाठी स्तंभलेखन करत.

वॉशिंग्टन:अंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणासंबंधी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जमाल खाशोगी वॉशिंग्टन पोस्टसाठी स्तंभलेखन करत. खाशोगींच्या हत्येला सौदी अरेबीयाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच परवानगी दिली होती. असं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. 2 ऑक्टोबरला जमाल खाशोगींची इस्तंबूलमधील सौदीच्या दूतावासात हत्या करण्य़ात आली होती. त्यांची हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यत आले होते. आता मात्र अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने महत्त्वाचा दावा केला आहे.

इस्रायलच्या मालवाहू जहाजाचा समुद्रात स्फोट; दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

सौदी अरेबियाचे राजकुमार यांनी खाशोगींची हत्या करण्यासाठी इस्तंबूल, तुर्कस्तानमध्ये ऑपरेशन राबवण्यासाठी परवानगी दिली होती. असं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दावा केला आहे. अमेरिका आता सौदी नागरिकांवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसा इशारा अमेरिकेचे जो बायडन यांनी प्रशासनाला दिल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिसावर निर्बंध घालण्याची शक्यता अमेरिकेकडून वर्तवली जात आहे. मात्र या निर्बंधातून सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना वगळण्यात येणार आहे.

 

पत्रकार जमाल खाशोगींच्या हत्येनंतर तीन महिन्यांनी एक व्हिडीओ समोर आला होता.या व्हिडीओमध्ये खाशोगींच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका सुटकेसमधून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तुर्कस्तानमधील 'ए हेबर' या टिव्ही चॅनलने हा दावा केला आहे. तीन माणसं पाच सुटकेस घेऊन जात असताना दिसत आहेत. खाशोगींच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. जमाल खाशोगी सौदीच्या दूतावासात काही महत्तवाची कागदपत्रे घेण्यासाठी गेले होते. मात्र ते परत जिवंत आलेच नाहीत. दूतावासातून खाशोगी कुठे गेले ते कुणाला माहीतच पडले नाही, असं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले. मात्र नंतर तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्य़ा चौकशीअंती जमाल खाशोगींची हत्या सौदीच्या दूतावासातच झाली असल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली. मात्र त्यांनतर या हत्य़ेचा संशय सौदी राजकुमाराकडे वळल्यानंतर ते काही महिने गायबही झाले होते.

 

संबंधित बातम्या