अमेरिकेचा सौदी अरेबियाला मोठा झटका

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने सौदी अरेबियावर काही निर्बंध लादत नागरीकांवर व्हिसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

वॉशिंग्टन : अंतरारष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने मोठा खुलासा केला होता. खाशोगींची हत्या सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या परवानगीने झाली असल्याचा दावा केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने सौदी अरेबियावर काही निर्बंध लादत नागरिकांवर व्हिसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकार जमाल खाशोगींची इस्तंबूलमधील सौदीच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. खाशोगी काही कागदपत्रे घेण्यासाठी सौदीच्य़ा दूतावासामध्ये गेले होते. मात्र नंतर परत ते आलेच नाहीत.

कैरिबियन देशातील तुरूंगात घडली सर्वात मोठी प्राणघातक घटना

दूतावासामध्ये त्यांची हत्या झाल्याचं नंतर उघडकीस आलं. पत्रकार जमाल खाशोगींच्या हत्येनंतर तीन महिन्यांनी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये खाशोगींच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका सुटकेसमधून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. तुर्कस्तानमधील 'ए हेबर' या टिव्ही चॅनलने हा दावा केला आहे, ''तीन माणसं पाच सुटकेस घेऊन जात असताना दिसत आहेत. खाशोगींच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते.'' 

 

जमाल खाशोगी सौदीच्या दूतावासात काही महत्तवाची कागदपत्रे घेण्यासाठी गेले होते. मात्र ते परत जिवंत आलेच नाहीत. दूतावासातून खाशोगी कुठे गेले ते कुणाला माहीतच पडले नाही, असं सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले. मात्र नंतर तुर्कस्तान आणि संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्य़ा चौकशीअंती जमाल खाशोगींची हत्या सौदीच्या दूतावासातच झाली असल्याची कबुली सौदी अरेबियाला द्यावी लागली. मात्र त्यांनतर या हत्य़ेचा संशय सौदी राजकुमाराकडे वळल्यानंतर ते काही महिने गायबही झाले होते. ''आजपासून अमेरिकेचे नवीन धोरण असेल, जे लोक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात सहभागी असतील त्यांच्यावर निर्बंध लादले जातील,'' असं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या