चीनच्या ५ जणांवर हॅकिंगचा आरोप

एएनआय
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

अमेरिका सरकारने पाच चिनी आणि दोन मलेशियाच्या नागरिकांविरोधात अमेरिकेतील शंभरहून अधिक ठिकाणी आणि इतरत्र अनेक ठिकाणी हॅकिंग केल्याचा आरोप ठेवला आहे

वॉशिंग्टन: अमेरिका सरकारने पाच चिनी आणि दोन मलेशियाच्या नागरिकांविरोधात अमेरिकेतील शंभरहून अधिक ठिकाणी आणि इतरत्र अनेक ठिकाणी हॅकिंग केल्याचा आरोप ठेवला आहे. यातील दोघा जणांना मलेशियात अटक करण्यात आली असून, इतर पाच जण चीनमध्ये आहेत, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. 

अमेरिकेच्या न्याय विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, या सात हॅकरनी अमेरिकेतील शंभरहून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले होते. याशिवाय इतर देशांतीलही दूरसंचार कंपन्या, विद्यापीठे, राजकीय पक्ष आणि हाँगकाँगमधील कार्यकर्ते यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. अमेरिका सरकारने या सात जणांची नावेही जाहीर केली आहेत. झँग हाओरान आणि तान दायलिन हे दोघे प्रमुख गुन्हेगार असून त्यांच्यावर कट रचने, हॅकिंग, ओळख लपवून गैरव्यवहार, आर्थिक गैरव्यवहार असे एकूण २५ आरोप आहेत. तसेच, जिआंग लिझी, किआन चुआन आणि फु किआंग यांच्यावरही अशाच प्रकारचे नऊ आरोप आहेत. हे पाचही चिनी नागरिक असून ते सध्या चीनमध्येच आहेत. 

 

संबंधित बातम्या