अमेरिका चीन आमने-सामने: तैवान, कोरोना, तिबेट मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक

अमेरिका चीन आमने-सामने: तैवान, कोरोना, तिबेट मुद्द्यावर अधिकाऱ्यांची बैठक
US China face to face Meeting of officials on Taiwan Corona Tibet issue

अलास्का: (US China face to face Meeting of officials on Taiwan Corona Tibet issue) अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि चीन यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अमेरिकेत सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकित दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर विरोधी मते मांडली आहेत. अलास्कामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्राच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन, आणि चीनचे परराष्ट्र संबंधाविषयीचे प्रमुख यांग जियेची यांनी आपआपल्या देशांच्या भूमिका मांडतानाच एकमेकांच्या धोरणावर टिका केल्याचं पहायला मिळालं आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तस्थेनं दिलं आहे.

जगातील दोन महासत्ता देशांच्या चाललेल्या चर्चासत्रात एकदम टोकाची भूमिका घेणे हे फारच दुर्मिळतेने पाहायला मिळतं. दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे आपले मुद्दे मांडले आहेत, यावरुन त्यांची व्यक्तिगत स्तरावरील चर्चा ही अधिक नाट्यमय रितीने होणार याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांमधील मागील काळापासून ताणलेल्या संबंधाची परिक्षा घेणारी चर्चा होणार की काय असं दिसत आहे. या बैठकीच्या पूर्वीच राजकीय जाणकारांनी शक्यता व्यक्त केली होती. आणि विशेष म्हणजे या दोन्ही देशांच्या तणावाची एक झलक बैठकीच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाली.

दोन्ही देशांमध्ये तिबेट, हॉंगकॉंग, तैवान आणि चीनच्या पश्चिमेकडील शिनझियांग क्षेत्रातील व्यापार तसेच मानवाधिकारांच्या मुद्द्यावर कमालीचे मतभेद दिसून आले. त्याचप्रमाणे तैवान, दक्षिण चीन समुद्र आणि त्यामध्ये चीनचा वाढता प्रभाव याचबरोबर जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये वादळी चर्चा झाली आहे. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका चीन यांच्यात निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी बायडन प्रशासनाने तयारी दाखवली असली तरी चीनच्या संदंर्भातील आक्षेपांची आणि ज्या मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत नाही अशा मुद्द्यांची यादीच बैठकीमध्य़े सादर केली आहे. (US China face to face Meeting of officials on Taiwan Corona Tibet issue)

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांनी बायडन प्रशासनाची चीनविरोधातील भूमिका स्पष्ट शब्दात मांडली आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेला विरोध करण्यासाठी अमेरिका इतर सहकारी देशांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचे ब्लिंकन यांनी स्पष्ट केलं आहे. तर यानंतर चीनचे परराष्ट्र प्रमुख यांग यांनी अमेरिकेच्या भूमिकेसंदर्भात चीनला असणारे आक्षेप आणि इतर विषयाच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका कशी वेगळ्या स्वरुपाची आहे याची यादीच वाचून दाखवली. अमेरिकेकडून चीनवर मानवाधिकारांच्या मुद्द्यावर घेतलेला आक्षेप यांग यांनी फेटाळून लावले. अमेरिकेच्या लोकशाहीची सध्याची अवस्था, अमेरिकेमध्ये अल्पसंख्यांकांना दिली जाणारी वागणूक, जागतिक व्यापारसंदर्भातील विषयांवर यांग यांनी अमेरिकेला चांगलंच सुणावलं. पैसा आणि लष्काराचा वापर करुन इतर लहान देशांवर दबाव निर्माण करण्याचा आरोप यांग यांनी अमेरिकेवर केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com