लस पुरवठ्यावरुन अमेरिकेच्या फायझर कंपनीने भारताला घातली अट

The US company Pfizer imposed a condition on India from supplying vaccines
The US company Pfizer imposed a condition on India from supplying vaccines

देशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. बुधवारी भारतात 24 तासामध्ये तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोविशील्ड (Covishileld) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना लसींना मान्यता देण्यात आली आहे. या लसींच्या माध्यमातून देशात गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. असं असतानाही सध्या कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेत परिस्थिती अधिकच चिंताजनक बनत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इतर देशांमधून कोरोनाची लस घेण्यासाठी तयारी दर्शवली आहे. अमेरिकेमधील फायझर (Pfizer) कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली आहे मात्र त्यासंदर्भात अट घातली आहे. (The US company Pfizer imposed a condition on India from supplying vaccines)

भारताने रशियन बनावटीच्या स्फुटनिक (Sputnik) लसीच्या निर्मितीला मान्यता दिल्यानंतर आता भारताची नजर अमेरिकेतील फायझर कंपनीच्या लसीकडे लागली आहे. त्यामध्येच आता भारताला लस देण्यासंदर्भात फायझर कंपनीने तयारी दर्शवली आहे. मात्र त्यावेळी भारतामध्ये देण्यात येणाऱ्या कोरोना लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच बायोटेकच्या माध्यमातून विकसीत करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायझरची लस भारतातील केवळ सरकारी रुग्णालयामध्येच उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘’कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता फायझर कंपनी आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधन्याने केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच भारतात कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे.’’

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झापाट्याने वाढू लागली असल्याने नियोजित दोन कोरोना लसींसोबतच इतर लसींच्या पर्यांयाचाही भारत सरकारकडून  विचार केला जात आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांना थेट परदेशी कंपन्याकडून लस देण्याची परवानगीच्या संदर्भात भारत सरकारकडून विचार केला जात आहे. मात्र फायझर कंपनीच्या लसीची किंमत 40 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांपर्यंत तीन हजार असण्याची शक्यता आहे. भारतामधील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची किंमत 300 रुपयांपर्यंत आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com