अमेरिकी न्यायालयाने वुईचॅटवरील बंदी रोखली

वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाचे एक कारण बनलेल्या वुईचॅट अॅपवरील बंदीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे अॅप डाउनलोड करू नये, असा फतवा ट्रम्प प्रशासनाने काढला होता.

न्यूयॉर्क: अमेरिका आणि चीन यांच्यातील वादाचे एक कारण बनलेल्या वुईचॅट अॅपवरील बंदीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हे अॅप डाउनलोड करू नये, असा फतवा ट्रम्प प्रशासनाने काढला होता.

या अॅपची मालकी टेनसेंट या चिनी कंपनीकडे आहे. २१ सप्टेंबरपासून ही बंदी लागू होणार होती. त्यास काही तास बाकी असताना कॅलिफोर्नियातील न्यायालयाने रविवारी हा देशव्यापी आदेश जारी केला. मुक्त संभाषणाच्या अधिकारासंदर्भात न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणुकीच्या प्रचारात चीनच्या विरोधावर भर दिला आहे. चीनमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. निवडणुकीतील डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन चीनच्या बाबतीत कमजोर भूमिका घेतात, असा आरोप ट्रम्प यांनी वारंवार केला आहे.

वुईचॅट अन् वाद

  •     बंदी लागू झाली असती, तर वुईचॅट अॅपचा वेग मंदावला असता
  •     युजरना कुटुंबीय आणि मित्रांच्या साथीत व्हिडिओ चॅट करणे शक्य झाले नसते
  •     वुईचॅटचा दररोज वापर करणारे अमेरिकेतील युजर सुमारे एक कोटी ९० लाख
  •     चिनी अॅपची मालकी असलेल्या कंपन्यांकडून अमेरिकी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी असा ट्रम्प यांचा आरोप
  •     चीनकडून पुराव्यांची मागणी; पण ट्रम्प प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
     

संबंधित बातम्या