अमेरिकेत 'गुगल' विरोधात खटला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

 ॲपल, ॲमेझॉन आणि फेसबुक यांच्यासारख्या आघाडीच्या कंपन्या जस्टिस डिपार्टमेंट आणि फेडरल ट्रेड कमिशनच्या रडारवर आल्या असतानाच आता गुगलच्या देखील नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 न्यूयॉर्क- ऑनलाइन सर्च आणि जाहिरात क्षेत्रामध्ये स्वतःच्या प्रभुत्वाचा गैरवापर केल्याप्रकरणी अमेरिकेच्या जस्टिस विभागाने आघाडीचे सर्च इंजिन गुगलविरोधात खटला भरला.

 ॲपल, ॲमेझॉन आणि फेसबुक यांच्यासारख्या आघाडीच्या कंपन्या जस्टिस डिपार्टमेंट आणि फेडरल ट्रेड कमिशनच्या रडारवर आल्या असतानाच आता गुगलच्या देखील नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बड्या कंपन्यांमधील स्पर्धेत समतोल राहावा यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेत कारवाईला सुरवात केली आहे. याआधी २० वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टविरोधात देखील अशाच पद्धतीचा खटला दाखल करण्यात आला होता. इंटरनेट सर्चिंग आणि ऑनलाइन जाहिरात क्षेत्रामध्ये गुगल मोठा गेट वे आहे. 
 

संबंधित बातम्या