
Earthquake of Magnitude 6.0 Hits Solomon Islands: सोलोमन बेटांवर आज सकाळच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणावले आहे. रिश्टल स्केलवर भुकंपाची तीव्रता 6.0 एवढी आहे. अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञांनी ही माहिती दिली.
या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही. भूगर्भशास्त्रज्ञांनी सुनामीचा इशाराही दिलेला नाही. सॉलोमन बेटे हे ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस सुमारे 2 हजार किमी अंतरावर नैऋत्य प्रशांत महासागरात स्थित एक द्वीपसमूह राज्य आहे.
एनसीएसने ट्विट करत माहिती शेअर केली की, 'मंगळवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:४९ वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू होनियाराच्या पश्चिम-वायव्य भागात 95 किलोमीटर भूगर्भात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही मोठा भूकंप झाला
सोलोमन बेटांवर भूकंप सामान्य आहेत. येथे जवळपास दरवर्षी भूकंप होत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये सोलोमन बेटांवर 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी त्सुनामीच्या संदर्भात हाय अलर्टही जारी करण्यात आला होता.
त्याचबरोबर अलीकडच्या काळात जगाच्या विविध भागात वारंवार भूकंपाच्या घटना पाहायला मिळत आहेत. या वर्षाच्या शेवटच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपात 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. सुमारे लाख लोक गंभीर जखमीही झाले.
पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वामध्ये
भूकंपाचे धक्के पाकिस्तान, अफगाणिस्तान तसेच भारतात 21 मार्च रोजी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.5 एवढी होती. या भूकंपात फारसे नुकसान झाले नसले तरी.
पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या भूकंपात 11 जणांचा मृत्यू झाला असून 160 जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदूकुश प्रदेश होता, तर त्याची खोली 180 किमी होती.
इस्लामाबाद, रावळपिंडी, क्वेटा, पेशावर, कोहाट, लकी मारवतसह पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव दिसून आला. त्याचवेळी भारतातील दिल्ली शहरात भूकंपाचे धक्के जाणवले. रात्रीच्या वेळी लोक घराबाहेर पडले आणि पळून गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.