USA: टॅक्स फ्रॉडप्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांची कंपनी आढळली दोषी

USA: एलन वीसेलबर्ग यांनी 50 वर्षे ट्रंप यांच्या कंपनीसाठी मुख्य वित्तिय अधिकारी होते त्यांना न्यायालयाने पाच महिन्यांची कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak

USA: अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप सातत्याने त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या न्यायालयाने डोनाल्ड ट्रंप यांच्या कंपनीला टॅक्स फ्रॉड प्रकरणात दोषी ठरवले आहे.

अमेरिकन कोर्टाने या गु्न्ह्याची शिक्षा म्हणून डोनाल्ड ट्रंप यांच्या कंपनीला 16.1 डॉलर लाख दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. 15 वर्षापर्यत ट्रंप यांच्या रिअल इस्टेट कंपननीने टॅक्स अधिकाऱ्यांना धोका दिला आहे असे निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात ट्रंप यांच्या कंपनीवर असलेल्या 17 पेक्षा अधिक अपराधांवर वर सुनावणी झाली होती.

त्यामध्ये ट्रंप ऑर्गनायझेशच्या 2 कंपन्या दोषी सापडल्या. त्यांना जास्तीत शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्याचबरोबर, एलन वीसेलबर्ग यांनी 50 वर्षे ट्रंप यांच्या कंपनीसाठी मुख्य वित्तिय अधिकारी होते त्यांना न्यायालयाने पाच महिन्यांची कारागृहाची शिक्षा सुनावली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रंप यांच्या व्यावसायिक कंपन्याचा अधिक तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर, कंपन्याना जेलची शिक्षा दिली जाऊ शकत नाही असेही अधिकाऱ्यांनी माहीती देताना म्हटले आहे.

Donald Trump
Philippines Floods: फिलिपाईन्समध्ये महापुर; 17 ठार तर 7 जखमी

दरम्यान, ट्रंप यांच्यावर इतरही खटले चालू आहेत. युएस( USA) कॅपिटलवर हल्ला, व्हाईट हाऊस सोडल्यानंतर कागदपत्रांमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आहे. त्याचबरोबर, जॉर्जीया( Company )मध्ये निवडणुकीनंतर झालेल्या गोंधळामध्ये ट्रंप यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com