अमेरिकेला मिळणार पहिले कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याचे निवृत्त जनरल लॉयड ऑस्टिन यांची देशाचे नवीन संरक्षणमंत्री म्हणून निवड करण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन :  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याचे निवृत्त जनरल लॉयड ऑस्टिन यांची देशाचे नवीन संरक्षणमंत्री म्हणून निवड करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, ते पेंटॅगॉन (संरक्षण मंत्रालय) ची जबाबदारी सांभाळणारे ते पहिले अमेरिकन-आफ्रिकन ठरणार आहेत.

अमेरिकेच्या माजी राजदूत समांथा पावर आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचं नेतृत्व करणार

इराकमधील लष्करी कमांडर म्ह्णून काम केलेले ऑस्टिन हे युद्धाच्या आव्हानांशी झुंज देऊन संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारणारे देशातील पहिले फोर स्टार जनरल असतील. बायडन यांच्या धोरणांना पाठिंबा देणारे विश्वासू व्यक्तिमत्व आहेत. 2016 मध्ये निवृत्त झालेले 67 वर्षीय लॉयड ऑस्टिन रणांगणात सैन्याचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय जनरल आहेत. संरक्षणमंत्री पदाचा त्यांचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

संबंधित बातम्या