पुतिन युद्ध कधी थांबवणार ? जाणून घ्या अमेरिकेने काय म्हटले
Vladimir PutinDainik Gomantak

पुतिन युद्ध कधी थांबवणार ? जाणून घ्या अमेरिकेने काय म्हटले

रशिया (Russia) युक्रेनवरील हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही आहे.

रशिया युक्रेनवरील हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही आहे. असे म्हटले जात आहे की, युक्रेन युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. विशेष म्हणजे पुतिन त्यासाठी नवी योजना आखत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक एव्हरिल हेन्स यांनी मंगळवारी सांगितले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन डॉनबास प्रदेशातील त्यांच्या मोहिमेने युक्रेन युद्ध संपवणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, पुतिन यांनी मोल्दोव्हामधील रशिया-नियंत्रित प्रदेशात पूल बांधण्याचा निर्धार केला आहे. (US National Intelligence Director Avril Haynes says Vladimir Putin has no plans to end the war in Ukraine)

Vladimir Putin
China: शी जिनपिंग 'सेरेब्रल एन्युरिझम' नावाच्या आजाराने ग्रस्त

दरम्यान, पुतिन मार्शल लॉ लागू करुन संपूर्ण देशाला एकत्रित करतील, अशी शक्यता अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. युक्रेनला मिळत असलेले अमेरिकेसह (America) नाटो देशांचे समर्थन कमी करण्यावर पुतीन ठाम आहेत. काही पाश्चात्य देश उघडपणे युक्रेनला पाठिंबा देणार नाहीत, असा विश्वास देखील पुतिन यांनी व्यक्त केला आहे.

"पुतिन युक्रेनमध्ये (Ukraine) दीर्घकाळ संघर्षाची तयारी करत आहेत. दरम्यान डोनबासच्या पलीकडे लक्ष्य साध्य करण्याचा त्यांचा हेतू आहे," असे अमेरिकन गुप्तचर विभागाचे अधिकारी हेन्स म्हणाले. उत्तरेकडील कीव (Kyiv) काबीज करण्यात अयशस्वी झाल्यामुळे पूर्वेकडील डॉनबास प्रदेशात रशियन सैन्याची जमवाजमव करण्याचा पुतिन यांचा निर्णय "केवळ तात्पुरता बदल" आहे, असे अमेरिकन गुप्तचरांना वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.