ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता! गाण्यातून अमेरिका-भारताचे संबंध मजबूत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

अमेरिकन नेव्हीच्या सदस्यांनी अभिनेता शाहरुख खान अभिनीत बॉलिवूडमधील नामांकित बॉलिवूड फिल्म स्वदेशमधील 'ये जो देश है तेरा, स्वदेस है मेरा, तुझे है पुकारा ...' हे गाणे गायलं.

वॉशिंग्टन: अमेरिकन नेव्हीच्या सदस्यांनी अभिनेता शाहरुख खान अभिनीत बॉलिवूडमधील नामांकित बॉलिवूड फिल्म स्वदेसमधील 'ये जो देश है तेरा, स्वदेस है मेरा, तुझे है पुकारा ...' हे गाणे गायलं. अमेरिकेचे भारतीय राजदूत तरनजितसिंग संधू यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. लोक सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करीत आहेत. 

हे गाणे यूएस नेव्हीने 27 मार्च रोजी रात्रीच्या जेवणाच्या वेळी गायले. रात्रीच्या जेवणाला अमेरिकेचे नौदल ऑपरेशन्स (सीएनओ) मायकेल एम. गिलडे आणि भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू देखील उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी ये जो देश है तेरा… गात असल्याचा व्हिडिओ संधू यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. "हे मैत्रीचे बंधन आहे, जे कधीही तुटू शकत नाही." असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.

हे गाणे एआर रहमान यांनी 2004 मध्ये स्वदेस या चित्रपटासाठी गायलं होतं. या व्हिडिओमध्ये, यूएस नेव्ही, गायक आणि बँड ची एक टीम दिसू शकते. 1.5 मिनिटांचा हा व्हिडिओ ट्विटरवर दोन लाख 10 हजार लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ 15 हजाराहून अधिक लोकांनी पसंत केला आहे.  

डिनर दरम्यान यूएस संरक्षण भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर देखील चर्चा करण्यात आली. परंतु या गाण्याने सर्वांचे मन जिंकली, असं संधू यांनी सांगितलं. 
"आम्ही स्वतंत्र, मुक्त आणि इंडो-पॅसिफिकच्या बाहेर असून त्याही सर्वसमावेशक नियमांना आधार देणार आणि सहकार्य करणार," असं अमेरिकेचे नौदल ऑपरेशनचे प्रमुख मायकेल एम. गुइलडे म्हणाले.

संबंधित बातम्या