अमेरिकेचे “पवार” जो बायडेन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

भर पावसातील या सभेनंतर सोशल मीडियातून बायडेन यांचे कौतुकतर झाले. सोबतच त्यांचे समर्पण पाहून अनेकांची त्यांनी मनेही जिंकली आहे परंतु “दिल्ली अजून दुर आहे.”

 

वाशिंग्टन :सध्या निवडणुकीचे वारे अमेरिकेत  वाहत आहेत. ट्रम्प विरुद्ध बायडेन असा सामना रंगात आला आहे. पण या सामन्यात पावसाने अडथळा आनण्याचा प्रयत्न केला. पण जो बायडेन मागे हटले नाहीत. त्यांनी आपली सभा सुरुच ठेवली. त्यांचे फोटो वायरल झाले. बायडेन ट्रेंड होऊ लागले. आणि सगळ्यांनीच तुलना करायला सुरुवात केली. शरद पवारांनीही भर पावसात सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रात मतांवर जो परिणाम पाहायला मिळाला, तसा परिणाम अमेरिकेतही पाहायला मिळणार का? याची चर्चा सगळ्यांच देशांमध्ये रंगू लागली आहे.

जागात चर्चा

आश्चर्याची बाब म्हणजे पवारांनी केलेल्या पावसातल्या सभेचा फोटोची आणि जो बायडेन यांचा भर पावसातला फोटो अगदी सारखा आहे. क्लिएरीटीचा मुद्दा सोडला, तर कंटेट या दोन्ही फोटोंनी भरभरुन दिलेला आहे, हे कोणी नाकारु शकत नाही. कारण भरपावसात केलेल्या सभेनंतर महाराष्ट्रात युतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं. यामध्ये पवारांच्या त्या पावसातल्या सभेचा मोलाचा वाटा होता. तसंच काहीसं अमेरिकेत होणार का? अशी चर्चा जगात चालू आहे.
 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन राजकीय कुस्तीच्या मैदानात उतरलेत. सभेदरम्यान आलेला पाऊस त्यांना मदत करतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचं बायडन यांच्यासमोर तगडं आव्हान आहे. तीन दिवसांआधी घडलेल्या या घटनेनं महत्त्वाची निवडणुकीला कलाटणी मिळणार का, याकडे सगळ्याचं लक्ष लागल आहे.

भर पावसातील या सभेनंतर सोशल मीडियातून बायडेन यांचे कौतुकतर झाले. सोबतच त्यांचे समर्पण पाहून अनेकांची त्यांनी मनेही जिंकली आहे परंतु “दिल्ली अजून दुर आहे.”

 

 

संबंधित बातम्या