ऋषि सुनक यांना मोठा धक्का बसणार? लिज ट्रस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर

लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांच्यात बीबीसीवर थेट वादविवाद होणार, या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
US PM Candidates Rishi Sunak Vs Liz Truss
US PM Candidates Rishi Sunak Vs Liz TrussDainik Gomantak

लंडन: सध्या ब्रिटनमध्ये (Britain) एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते म्हणजे भारतीय वंशाचे ऋषी सुनक. ऋषी सुनक हे ब्रिटिश पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आतापर्यंत झालेल्या मतदानातही सुनक (Rushi Sunak) यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र आता सुनकचे हे स्वप्न पूर्ण होणार की नाही असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहे. एका नवीन सर्वेक्षणात, परराष्ट्र सचिव लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ब्रिटनच्या पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्यावर 28 मतांची आघाडी घेतली आहे. (Rishi Sunak Vs Liz Truss)

YouGov ही ब्रिटीश आंतरराष्ट्रीय इंटरनेट-आधारित बाजार संशोधन आणि डेटा विश्लेषण फर्म आहे. YouGov च्या सर्वेक्षणानुसार, गुरुवारी बोरिस जॉन्सनचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी कंझर्वेटिव्ह पक्षाच्या सदस्यांनी ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांना मतदान करण्यासाठीच्या अंतिम फेरीत भाग घेतला. आता या दोघांसाठी सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत मतदान होणार आहे. (US PM Candidates Rishi Sunak Vs Liz Truss)

US PM Candidates Rishi Sunak Vs Liz Truss
UK PM Race: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल

दरम्यान, जॉन्सनच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक यांच्यासाठीही पंतप्रधान होण्याचा मार्ग सोपा दिसत नाही, कारण त्यांना आता टोरी सदस्यांमध्ये अत्यंत कठीण मताचा सामना करावा लागणार आहे. लिझ ट्रस यांना आधीच बोरिस जॉन्सनचा पाठिंबा आहे.आणि त्या मुळच्या ब्रिटन नागरिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचा कल असल्याचे चिन्ह दिसायला लागले आहे.

24 टक्के मतांची आघाडी

स्काय न्यूजच्या अहवालानुसार, या आठवड्याच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार 46 वर्षीय ट्रस ऋषी सुनक यांना आमने-सामने च्या लढतीत 19 मतांनी मात देणार, असे सांगण्यात येत आहे. बुधवार आणि गुरुवारी 730 कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांच्या सर्वेक्षणानुसार, 62 टक्के लोकांनी सांगितले की ते ट्रसला मतदान करतील. तर 38 टक्के लोकांनी ऋषी सुनक यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर दोघांपैकी कोणालाही मतदान न केल्याचे सांगितले आहे. ट्रसकडे दोन दिवसांपूर्वी 20 मतांच्या वाढीवरून 24 टक्के मतांची आघाडी होती.

एकेरी गटात सुनकने ट्रसचा पराभव केला

कंझर्व्हेटिव्ह सदस्यत्वाची वर्तमान परिस्थिती सध्या काय आहे हे सांगता येणार नाही. 2019 मध्ये गेल्या नेतृत्वाच्या निवडणुकीत सुमारे 1 लाख 60,000 सदस्य होते. हा आकडा आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे मतदान करणारा पक्ष प्रतिनिधी नसतो. आकडेवारी असेही दर्शविते की लिझ ट्रसने पुरुष आणि महिला अशा जवळजवळ प्रत्येक श्रेणीत सुनकला मागे टाकले आहे. ब्रेक्झिटला मतदान करणाऱ्या सदस्यांचा विश्वासही ट्रसने जिंकला. एकेरी गटात सुनकने ट्रसचा पराभव केला आहे. आता पुढे काय होणार हे येणाऱ्या वेळेत कळेल.

सुनकचे सर्वात मोठे आव्हान

पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी आता सुनक यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अंदाजे एक लाख 60 हजार मतदारांना त्यांच्या बाजूने पोस्टल बॅलेट टाकण्यासाठी तयार करावे लागेल. ट्रस आणि सुनक यांच्यात या सोमवारी बीबीसीवर थेट वादविवाद होणार आहे. या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर पोस्टल बॅलेटवर मतदान होणार आहे. यूकेच्या नवीन पंतप्रधानांचे नाव 5 सप्टेंबर रोजी जगासमोर येणार आहे.

लिझ ट्रस तळागाळात खूप लोकप्रिय आहेत

लिझ ट्रस या पुराणमतवादी मतदार आणि अनेक राजकारण्यांमध्ये लोकप्रिय आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाबाबत युद्धविरामाची भूमिका स्पष्ट झाली आहे. परराष्ट्र सचिव या नात्याने पुतीन यांना युद्धासाठी जबाबदार धरण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. या भूमिकेमुळे त्यांची प्रतिमा मजबूत झाली आहे. स्थानिक लेवलवर लिझ ट्रस खूप लोकप्रिय आहे. दुसरीकडे, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाचेही समर्थन करा, पण ऋषी सुनक यांचे करू नका असे आवाहन करत आहेत.

US PM Candidates Rishi Sunak Vs Liz Truss
Sri Lanka Crisis: दिनेश गुणवर्धना बनले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

ऋषी सुनक यांचे मत काय आहे?

ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत आणि नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंड (यॉर्क) मतदारसंघातून संसद सदस्य आहेत. 2015 मध्ये ते येथून विजयी झाले होते. 2019-2020 मध्ये ते मुख्य कोषागार सचिव होते आणि फेब्रुवारी 2020 मध्ये ते अर्थमंत्री झाले. "ही नेतृत्व स्पर्धा आमच्या पक्षाचा नेता होण्यापेक्षा अधिक आहे, ती आमच्या ब्रिटनचा संरक्षक होण्याबद्दल आहे," सुनक यांनी या महिन्याच्या सुरुवातीला नेतृत्वासाठी उमेदवारी सादर केल्यापासून अनेक वादविवाद आणि मुलाखतींमध्ये असे वक्तव्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com