अमेरिका रशियावर निर्बंध घालण्याच्या तयारीत; जाणून घ्या कारण

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

अमेरिका सोलरविंड्स, सायबर सुरक्षा आणि हॅकिंग,अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैनिकांवर इनाम लावणे, असं कृत्य रशियाकडून सातत्याने करण्यात आले आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे जो बायडन प्रशासन रशियातील विरोध पक्षनेते एलक्सी नवेल्नी यांना विष देणे, तसेच त्यांना तुरुंगात पाठवणे या कारणावरुन रशियावर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे. सीएनएनने यासंबंधीचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे.

सीएनएनला मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका युरोपीय संघाच्या मदतीने रशियावर प्रतिबंध कशापध्दतीने लावण्यात यावेत तसेच त्याचा कालावधी किती असावा हे ठरवणार आहे. परंतु बायडन प्रशासनातील एका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानुसार रशियावरील प्रतिबंध हा अमेरिकी लोकशाहीवर सातत्याने रशियाकडून करण्यात हल्ल्यासंबंधी लावण्यात येतील.

चीननं भारतातील केली बत्ती गुल? अमेरिकेनं उघड केली धक्कादायक माहिती

अमेरिका सोलरविंड्स, सायबर सुरक्षा आणि हॅकिंग,अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैनिकांवर इनाम लावणे, असं रशियाकडून कृत्य सातत्याने करण्यात आले आहे. यामुळे अमेरिका रशियावर नाराज आहे. बायडन प्रशासनाकडून रशियावर पहिल्यांदा प्रतिबंध लावण्यात येणार आहेत.अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नितीच्या विरुध्द निती बायडन प्रशासन रशिय़ाविरोधात वापरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने रशिय़ाचे अध्यक्ष ब्लादामिर पुतीन यांच्याबाबतीत मवाळ धोरण आखले जात असल्य़ाचा आरोप लावण्यात आले. खासकरुन 2018 मध्ये ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटी दरम्यान ट्रम्प यांनी 2016 मध्ये अमेरिकेत पार पडलेल्य़ा निवडणूकांमध्ये रशियाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नव्हता. मात्र अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं रशियाच्या या हस्तक्षेपाचे पुरावे दिले होते.   
 

संबंधित बातम्या