कुत्र्यांमुळे जो बायडन सापडले अडचणीत; करावा लागला खोचक कमेंटचा सामना

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन त्यांच्या कुत्र्यामुळे अडचणीत सापडले आहेत. ज्याने सुरक्षा सेवा एजंटवर प्राणघातक हल्ला केला आहे.​

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन त्यांच्या कुत्र्यामुळे अडचणीत सापडले आहेत. ज्याने सुरक्षा सेवा एजंटवर प्राणघातक हल्ला केला आहे. त्यांची पाळीव कुत्री मेजर आणि चँप यांना व्हाइट हाऊसच्या दुर डेलावेयर येथे पाठविले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीक्रेट सर्व्हिस एजंटवर बायडनच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला, ज्यामुळे एजंट किरकोळ जखमी झाला आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

“कुत्री नवीन वातावरण आणि नवीन लोक यांच्यात नुकतेच आले आहेत, त्यांना या वातावरणाची पूर्णपणे सवय झाला नाही. सोमवारी, फर्स्ट प्रेसिडेंट फॅमिली चा कुत्रा मेजरला आजूबाजूचे वातावरण अपरिचीत असल्याने त्या अनोळखी व्यक्तीवर त्याने हल्ला केला आणि व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली, ज्याची माहिती व्हाईट हाईजने नंतर दिली. नंतर मेडिकल युनिटने परिस्थिती सांभाळून घेतली. एजंटला  जास्त दुखापत न झाल्याने पुढील उपचारांची गरज भासली नाही,” अशी माहिती साकी यांनी दिली. मात्र हा हल्ला सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटवर झाला असे त्यांनी म्हटले नाही.

ब्राझीलमध्ये पी 1 व्हेरियंट या नव्या संसर्गामुळे वैज्ञानिकांनी जगाला दिला हा इशारा 

या घटनेनंतर त्यांच्यावर अनेक प्रकारे टिका केल्या जात आहे. त्यावर लोकांनी तीव्र कमेंट केल्या आहेत. काहींनी त्यांना “जो बायडन कुत्र्यांना प्रशिक्षण देवू शकत नाही, पण आम्ही मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवत आहोत,” अशा प्रकारची खोचक प्रतिक्रिया आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

संबंधित बातम्या