अण्वस्त्रबंदी करारातून माघार घ्या अमेरिका

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र बंदी कराराला मंजुरी दिलेल्या देशांनी ही मंजुरी मागे घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र अमेरिकेने या देशांना पाठवले आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र बंदी कराराला मंजुरी दिलेल्या देशांनी ही मंजुरी मागे घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र अमेरिकेने या देशांना पाठवले आहे.

अण्वस्त्रांवर बंदी घालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी किमान ५० देशांची सही होणे आवश्‍यक असून, ही अट याच आठवड्यात पूर्ण होईल, असा करारसमर्थकांचा दावा आहे. या कराराला मान्यता देणाऱ्या देशांनी अण्वस्त्रांचा विकास, चाचणी, उत्पादन करू नये, खरेदी करू नये किंवा साठा करून ठेवू नये, असे या कराराच्या मसुद्यात म्हटले आहे. मात्र, हा करार गेल्या ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या अण्वस्त्रबंदी करारासाठी धोकादायक असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. 

संबंधित बातम्या