कोरोना लसीच्या कच्च्या मालावरील निर्बंध हटवण्याबद्दल अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

अमेरिका निर्बंध उठवण्याबद्दल कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे दिसून येते आहे.

कोरोना लस तयार करण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर निर्बंध लावल्यानंतर अमेरिकेने आता या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली असल्याचे समजते आहे. भारताच्या फार्मासिटिकल गरजांबद्दल आपल्याला जाणीव असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. तसेच देशातील आवश्यकता आणि गरजांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेमुळेच निर्यातीवर निर्बंध आणण्यात आल्यामुळे कच्या मालाचा पुरवठा बंद झाल्याचे देखील अमेरिकेने यावेळी मान्य केले आहे. (US response to lifting restrictions on raw material for corona vaccine)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन  यांच्याकडून देशात डिफेन्स प्रोडक्शन ACT लागू करण्यात आलेला आहे.त्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांना आधी देशातील गरजांना पूर्ण करण्यासाठी मालाचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अमेरिकेतील कंपन्या देशातील गरजांना प्राध्यान्य देत असल्याचे पाहायला मिळते आहे. या कायद्यामुळे कंपन्यांना औषधांपासून ते पीपीई किट पर्यंत र्व गोष्टीच्या उत्पादनात कंपन्यांना आधी देशाच्या गरजांना पूर्ण करावे लागते. अमेरिकेत फायजर आणि मॉडर्ना या दोन कंपन्यांकडून लसीचे उत्पादन होत असून, देशात लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. येत्या जून महिन्यापर्यंत अमेरिकेतील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची तयारी अमेरिकेने केली नसल्याचे सांगण्यात येते आहे.  

असा झाला इस्राईल कोरोना मुक्त; वाचा सविस्तर 

भारतात सध्या कोरोना संसर्गामुळे  गंभीर परिस्थिती आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीची आवश्यकता आहे. मात्र देशात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे दिसते आहे. तर अमेरिका निर्बंध उठवण्याबद्दल कुठलीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याचे दिसून येते आहे.  काही दिवसांपूर्वी कवी शिल्ड तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे कंसाच्या मालाच्या निर्यातीवर लावलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. 

संबंधित बातम्या