'Xi Jinping घाबरलेल्या गुंडासारखे वागतायेत', नॅन्सी पेलोसींचा चीनवर हल्लाबोल

China Vs America: चीन आणि अमेरिका तैवान मुद्यावरुन पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
Nancy Pelosi
Nancy Pelosi Dainik Gomantak

China Vs America: चीन आणि अमेरिका तैवान मुद्यावरुन पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. यातच आता अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या धमक्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पेलोसी यांनी म्हटले की, 'चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग एका 'गुंडा' सारखे वागत आहेत.' त्या पुढे म्हणाल्या की, 'शी जिनपिंग स्वतःच्या असुरक्षिततेमुळे अशा धमक्या देत आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही धमक्यांना घाबरुन आमचे शेड्यूल बदलू.'

दरम्यान, एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान पेलोसी म्हणाल्या, 'अमेरिकेतील (America) काँग्रेसचे लोक चीनच्या इशाऱ्यावर चालणार नाहीत. चीनला (China) तैवानला एकटे पाडायचे आहे, परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही.' चीनच्या अर्थव्यवस्थेबद्दल पेलोसी म्हणाल्या की, 'मला वाटते की चीन आर्थिक संकटातून जात आहे.'

Nancy Pelosi
भारत संघर्षानंतर Xi Jinping पहिल्यांदाच तिब्बत मध्ये दाखल; सीमाभागाचा केला दौरा

दुसरीकडे, चीनच्या आक्षेपानंतरही गेल्या आठवड्यात नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) तैवानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. पेलोसी यांच्या भेटीपूर्वी आणि नंतर चीन धमक्या देत राहिला, त्याने सीमेवर लष्करी युध्दाभ्यासही केला. चीनने तैवानच्या (Taiwan) राजधानीवरही अनेक क्षेपणास्त्रे डागली. काही क्षेपणास्त्रे आपल्या सागरी हद्दीतही पडल्याचा दावा जपानने केला आहे.

Nancy Pelosi
America and China News : अमेरिका-चीन संघर्षात नेपाळची गोची

तैवाननेही युद्ध सराव सुरु केला

आता तैवाननेही चीनच्या कृतीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली आहे. वृत्तानुसार, तैवान देखील युध्दाभ्यास सुरु केला आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, चीन आक्रमणाच्या तयारीत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com