''अमेरिकन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा अधिकार''

''अमेरिकनांचे संरक्षण करण्यासाठी समाज म्हणून अधिक काही केले पाहिजे''
''अमेरिकन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा अधिकार''
us supreme courtDainik Gomantak

गेल्या महिन्यात अमेरिकेत घडलेल्या हत्याकांडाच्या घटनांनी अमेरिकेसह संपुर्ण जग हळहळले होते. शेकडो वर्षे शस्त्रे बाळगण्यासाठीच्या कायद्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या एका भाषणात नमुद केले होते. तसेच अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरत आम्हांला या संकटातून वाचवा असे म्हणत निदर्शने केली होती. असे असताना यूएस सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा पुर्ण अधिकार आहे. असा निर्णय दिला आहे. (us supreme court says americans have right to carry gun in public place )

us supreme court
चीनने पाकिस्तानला दिलेल्या 'Type 054A फ्रीगेटचे जाणून घ्या वैशिष्ट्ये

मे महिन्यामध्ये दोन भयानक सामूहिक गोळीबार होऊन ही न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामूळे अमेरिकन नागरिकांच्या काळजीत वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे. जेव्हा अमेरिकेत गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. यामूळे अमेरिकेतील शहरात अथवा सार्वजनिक ठिकाणी कायदेशीरित्या शस्त्रे बाळगता येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

us supreme court
पाकिस्तानची लाचारी, कर्ज फेडण्यासाठी ड्रॅगनला देणार 'गिलगिट-बाल्टिस्तान'?

या निर्णयावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावर आपले मत नोंदवताना म्हटले की, हा निर्णय सामान्य नागरिक आणि संविधानाच्या विरुद्ध आहे. याचा आम्हा सर्वांना खूप त्रास झाला आहे. आम्ही आमच्या सहकारी अमेरिकनांचे संरक्षण करण्यासाठी समाज म्हणून अधिक काही केले पाहिजे. मी देशभरातील अमेरिकन लोकांना बंदूक सुरक्षेबाबत आवाज उठवण्याचे आवाहन करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com