कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती

अमेरिकेत याआधीही राष्ट्रपतींचे अधिकार उपराष्ट्रपतींकडे हस्तांतरित करण्यात आले होते, तेव्हा 2002 आणि 2007 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची कोलोनोस्कोपी झाली.
कमला हॅरिस बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
US vice president Kamala Harris became first women president for 1 hour 25 minutes Dainik Gomantak

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती (US Vice President) कमला हॅरिस (Kamala Harris) 1 तास 25 मिनिटे देशाच्या राष्ट्रपतीपदी (USA President) विराजमान झालेल्या पाहायला मिळाल्या . अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सध्या त्यांच्या नियमित कोलोनोस्कोपी चाचण्यांसाठी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे अधिकार सोपवले होते . मात्र, बायडन आता पुन्हा एकदा आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांचे डॉक्टर म्हणतात की राष्ट्रपती "निरोगी" आहेत आणि त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. (US vice president Kamala Harris became first women president for 1 hour 25 minutes)

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 'अनेस्थेसिया' चा आजार आहे , या उपचारासाठी गेल्यानंतर कमला हॅरिस 1 तास 25 मिनिटांसाठी अमेरिकेच्या कार्यवाहक अध्यक्ष बनल्या होत्या. याबाबत माहिती देताना व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, हॅरिस आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर बायडन यांनी शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11:35 वाजता आपली जबाबदारी स्वीकारली.तर दुसरीकडे वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये अध्यक्षांची पाच तासांहून अधिक काळ कसून शारीरिक तपासणी झाली आहे.

US vice president Kamala Harris became first women president  for 1 hour 25 minutes
भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी टोचले चीनचे कान

अमेरिकेत याआधीही राष्ट्रपतींचे अधिकार उपराष्ट्रपतींकडे हस्तांतरित करण्यात आले होते, तेव्हा 2002 आणि 2007 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू. बुश यांची कोलोनोस्कोपी झाली. कोलोनोस्कोपीमध्ये नळी टाकून मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते. यूएस मध्ये, ही एक नित्याची प्रक्रिया आहे की जेव्हा राष्ट्रपती अशा वैद्यकीय परिस्थितीतून जातात तेंव्हा राष्ट्रपतीपदाची सत्ता उपराष्ट्रपतीकडे सोपवली जाते. अमेरिकन राज्यघटनेच्या 25 व्या दुरुस्तीच्या कलम-3 अंतर्गत अध्यक्षीय अधिकार हस्तांतरित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.उपराष्ट्रपतींची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यासाठी राष्ट्रपती हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि अमेरिकन संसदेच्या सिनेटच्या अध्यक्षांना पत्र लिहावे लागते.

2009 पासून जो बायडन यांचे डॉक्टर असणारे , डॉ. केविन ओ'कॉनर यांनी व्हाईट हाऊसने जारी केलेल्या सहा पानांच्या अहवालात सांगितले की ,"बायडन हे 78 वर्षांचे निरोगी पुरुष आहेत , ते अध्यक्ष म्हणून आपली कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडण्यास योग्य आहेत ."

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com