अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती बॉम्ब धमाक्यातून बचावले

वॉशिंग्टनमधील (Washington) डनबर हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला होता.
 Kamala Harris & Douglas Emhoff
Kamala Harris & Douglas EmhoffDainik Gomantak

अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांचे पती (Husband) वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) बॉम्ब धमक्यातून बचावले. एका हायस्कूलमध्ये कमला हॅरिस यांचे पती कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्या अमेरिकेत ब्लॅक हिस्ट्री मंथ (Black History Month) सुरु आहे. त्याच निमित्ताने वॉशिंग्टनमधील (Washington) डनबर हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बॉम्बस्फोटाचा इशारा देण्यात आला होता. अमेरिकेचे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे पती डग्लस एमहॉफ (Douglas Emhoff) ज्यांना अधिकृतपणे अमेरिकेत सेकंड जेंटलमन (Second Gentleman) म्हटले जाते. मात्र कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी त्यांना बॉम्ब धमाक्यातून वाचवले. त्यानंतर त्या ठिकाणाहून मुलांनाही निघून जाण्याच्या सूचना दिल्या. (US Vice President Kamla Harris's Douglas Emhoff Evacuated In Bomb Threat)

वॉशिंग्टनचे प्रवक्ते एनरिक गुटेरेझ यांनी पत्रकारांना सांगितले की, "बॉम्बस्फोटाचा धोका होता. आज आम्हाला या ठिकाणी धोक्याचा इशारा मिळाला आहे. आम्ही खबरदारी म्हणून सर्वांना बाहेर काढण्यास सांगितले. सर्वजण सुरक्षित असून इमारतीला आता कोणताही धोका नाही."

 Kamala Harris & Douglas Emhoff
अमेरिका-तैवान करार बद्ध! चीनला धक्का

दरम्यान, बॉम्बस्फोटाची धमकी कोणत्या प्रकारची होती याबद्दल अधिक माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कमला हॅरिस यांचे पती डग्लस एमहॉफ यांच्या प्रवक्त्या केटी पीटर्स यांनी ट्विट करत म्हटले की, "सेकंड जेंटलमेन विद्यार्थी आणि शिक्षकांना भेटत असलेल्या शाळेतील सुरक्षा धोक्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला देण्यात आली होती."

ते पुढे म्हणाले, "मिस्टर एमहॉफ आता सुरक्षित आहेत. त्याचबरोबर शाळाही रिकामी करण्यात आली आहे. आम्ही गुप्तचर यंत्रणा आणि वॉशिंग्टन डीसी पोलिसांचे आभारी आहोत."

शिवाय, कमला हॅरिस (Kamala Harris) या अमेरिकेच्या (America) उपराष्ट्रपती झालेल्या पहिल्या महिला आहेत. तसेच हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई-अमेरिकन महिला आहेत. तसेच त्यांचे पती एमहॉफ वकील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com