भारत - पाकिस्तान संघर्षविरामाच्या निर्णयाचे अमेरिकेकडून स्वागत

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या संयुक्त कराराचे आम्ही स्वागत करतो.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेला संघर्ष सहमतीने थांबल्यानंतर याच पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर शांतता राखण्यासाठी महत्त्वपूर्ण करार झाला आहे. दोन्ही देशांकडून जम्मू काश्मीरसह इतर भागामधील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांवण्यावर सहमती झाली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दक्षिण आशियामध्ये स्थिरता आणि शांतत निर्माण करण्यासाठी या दोन्ही देशांचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

व्हाइट व्हाइसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी गुरुवारी पार पडलेल्या प्रत्रकार परिषदेत, ''बाइडन प्रशासन पाकिस्तानसह दक्षिण आशियातील नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अमेरिका भारत आणि पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या संयुक्त कराराचे आम्ही स्वागत करतो. दोन्ही देशातील मिलिटरी डायरेक्टर जनरल यांच्यात पार पडलेल्या.या संयुक्त कराराची अमंलबजावणी 25 फेब्रुवारी पासून होणार आहे. दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी या दोन्ही देशांचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आणि यामध्ये अमेरिकेचेही हितसंबंध आहेत. आम्ही या दोन्ही देशांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहीत करतो.''

'युध्दविरामास भारत- पाकिस्तानची तयारी'

पाकिस्तान दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे का या प्रश्नाला उत्तर देताना साकी  म्हणाल्या, ''अमेरिकेची इंटलिजन्स आणि परराष्ट्र मंत्रालया या संबंधी अधिक सांगू शकेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2003 मध्ये झालेल्या युध्दविरामाच्या कराराचे पालन या दोन्ही देशांकडून करण्यात येणार आहे. काश्मीरसह अन्य मुद्द्यावर दोन्ही देशांमधील वार्तालापाचे आम्ही स्वागत करतो. पाकिस्तान एक महत्त्वपूर्ण सहयोगी देश आहे, आणि पाकिस्तानबरोबर अमेरिकेचे हितसंबंध जोडले गेले आहेत''.

संबंधित बातम्या