
China Vs America: अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या तैवानला गेल्यास अमेरिकेला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनने दिला आहे. अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांना तैवानला जाण्यापासून रोखण्यासाठी चीनी सैन्याने शक्तीप्रदर्शन देखील केले आहे.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, पेलोसी सध्या आशिया दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यामध्ये तैवानला जाण्याची कोणतीही योजना नव्हती. विशेष म्हणजे, त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की, पेलोसी या इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत, ज्यामध्ये सिंगापूर, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या 25 वर्षात अमेरिकेतील (America) निवडून आलेल्या एकाही उच्चपदस्थ सदस्याने तैवानला भेट दिलेली नाही. तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्यास गंभीर परिणाम सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीमुळे अमेरिका तैवानमध्ये फुटीरतावादी अजेंड्यावर काम करत असल्याचा चीनचा विश्वास आहे.
दुसरीकडे, पेलोसी यांनी रविवारी पुष्टी केली की, आशियाई देशांमध्ये काँग्रेसच्या प्रतिनिधींचे त्या नेतृत्व करणार आहेत. परंतु त्यांनी तैवान दौऱ्यावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही.
शिवाय, तैवान (Taiwan) हा चीनचा अविभाज्य असल्याचा दावा चीन सातत्याने करत आला आहे. यातच पेलोसी यांच्या कथित तैवान दौऱ्यावरुन चीनचा (China) चांगलाच संतापला आहे. पेलोसी यांच्या प्रस्तावित दौऱ्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. यामध्ये चीनने अमेरिकेला इशारा दिला होता की, "आगीशी खेळाल तर नष्ट व्हाल.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.