
USA First Lady Jill Biden Tested Positive for Covid 19, President Joe Biden India Visit is in Trouble:
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी जिल यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती व्हाइट हाउसकडून देण्यात आली आहे.
जिल बायडन या आजारी असल्याने त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर खबरदारी म्हणून राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचीही कोविड टेस्ट केली. मात्र, ती निगेटिव्ह आली आहे. जिल यांना मागच्या वर्षी २०२२ ऑगस्ट महीन्यात कोरोनाची लागण झाली होती.
जिल बायडन यांना दुसऱ्यांदा कोरोनीचा संसर्ग झाल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतामध्ये होणाऱ्या जी २० शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार की नाही याबाबत शंका आहेत.
सध्या जिल यांच्यावर डेलावेयरमधील रेहोबाथ येथे त्यांच्या घरी उपचार सुरु आहेत. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन यांची आठवडा भर तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान त्यांच्या लक्षणांवर लक्ष दिले जाणार आहे.
जो बायडन ७ सप्टेंबर ला अमेरिकेतून भारताकेड रवाना होतील. आणि ९ तारखेला जी २० शिखर परिषदेला उपस्थित राहतील.
भारतात आल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर द्विपक्षीय बैठक करतील अशी माहिती व्हाइट हाउसकडून नुकतीच देण्यात आली आहे. भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधावर बायडन चर्चा करतील
येत्या ९ ते १० सप्टेंबरला भारतात दिल्ली येथे ही परिषद होणार आहे. परिषदेला जगभरातील अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. भारत जी २० शिखर परिषदेचे प्रथमच आयोजन करत आहेत.
G20 ला ग्रुप ऑफ 20 असेही म्हणतात. आर्थिक सहकार्यासाठी हे एक प्रमुख व्यासपीठ आहे. G20 मंच आंतरराष्ट्रीय आर्थिक मुद्दे सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
याशिवाय आर्थिक स्थैर्य, जागतिक व्यापार, जागतिक आव्हाने अशा अनेक मुद्द्यांवर धोरण ठरवण्यात G20 महत्त्वाची भूमिका बजावते. G20 गटाचे कोणतेही स्थायी कार्यालय नाही. सर्व 19 देश आणि युरोपियन युनियन यांच्यात एक विशेष प्रकारची रोटेशन प्रणाली चालवली जाते. त्याद्वारे नवा अध्यक्ष निवडला जातो.
G20 गटाच्या स्थापनेला जवळपास 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत एकूण 17 G20 बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यंदा ही 18 वी G20 शिखर परिषद नवी दिल्ली येथे होणार आहे.
G20 मध्ये एकूण 19 देश आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. या 19 देशांमध्ये भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, कोरिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम हे आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.