डोनाल्ड ट्रम्प व पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण

donald trump tested positive with corona virus
donald trump tested positive with corona virus

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगील तालीम सुरू झाली असताना ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या खासगी सल्लागाराचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघांनी स्वत:ला अलग करून घेतले आहे. कोरोनाची  लक्षणे दिसल्यानंतर ट्रम्प यांची खासगी सल्लागार  हिक्सने चाचणी करून घेतली होती. यात ती कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले होते. 
होप हिक्स एअर फोर्स वनमधून नेहमीच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत प्रवास करते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्येही होप हिक्स हिच्यासह इतर वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. व्हाइट हाउसने म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या आणि अमेरिकेची सेवा करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेकडे गांभीर्याने पाहतात. 
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटले होते की, होप हिक्स यांना कोरोना झाला आहे. हिक्स न थांबता मोठ्या कष्टाने काम करते. तिचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने माझी आणि मेलानियाची कोरोना चाचणी केली असून रिपोर्टची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, आम्ही स्वत:ला क्वारंटाइन केले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com