अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या वापरला आणखी दोन देशांनी दिली स्थगिती

दैनिक गोमन्तक
सोमवार, 15 मार्च 2021

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग पकडत असतानाच आता एक नवीन समस्या उदभवल्याचे चित्र समोर येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग पकडत असतानाच आता एक नवीन समस्या उदभवल्याचे चित्र समोर येत आहे. कोरोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी म्हणून विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीमुळे रक्तात गाठी होत असल्याचे काही देशांच्या आरोग्य विभागांनी म्हटले होते. व त्यानंतर या लसींचा वापर तात्काळ थांवण्याचा निर्णय घेतला होता. या देशांमध्ये आता इटली आणि फ्रान्सची देखील भर पडली असल्याचे समजते. इटली आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या वापरला स्थिगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये लिलि सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा      

अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाचे वेगवेगळ्या देशातील काही लोकांवर गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले होते. डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड, नेदरलँड आणि आइसलँड मध्ये अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या लोकांच्या रक्तामध्ये गाठी झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणातून निदर्शना आले होते. तसेच या लसीच्या परिणामांमुळे झालेल्या मृत्यूंची चौकशी करण्याचे आदेश देऊन ऑस्ट्रियाने सुद्धा ही लस वापरण्याचे थांबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी देखील युरोपियन मेडिसीन एजन्सीचा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या सुरक्षेबाबतचा निर्णय प्रलंबित असेपर्यंत या लसीच्या वापरला स्थगिती देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तर यापूर्वी इटलीमध्ये 57 वर्षीय व्यक्तीची लस घेतल्यानंतर मृत्यूची घटना समोर आली होती. व या घटनेनंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या भीतीबद्दल सावधगिरीचा उपाय म्हणून अ‍ॅस्ट्राझेनेका लसीवर रोख लावली आहे. 

गेल्या आठवड्यात डेन्मार्क आणि नॉर्वेने अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या वापरानंतर रक्तस्त्राव, रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेटची संख्या कमी होण्याचे निदर्शनास आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर आइसलँड आणि बल्गेरिया यांनी देखील अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला रोखण्याचा निर्णय घेतला होता. या पाठोपाठ आयर्लंड आणि नेदरलँडने देखील अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला थांबविले होते. याउलट जागतिक आरोग्य संघटनेने आज अ‍ॅस्ट्राझेनेका लसीच्या वापरला न थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.      

आशिया आणि युरोपातील काही राष्ट्रांनी अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा वापर करण्याचे थांबवल्या नंतर जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीकरणाला न थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय युरोपियन मेडिसिनने सुद्धा याबद्दल स्पष्टीकरण देताना, युरोपीयन अधिकाऱ्यांनी अधिकच्या चाचण्या घेतल्या असून, या चाचण्यांमधून कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे. तर लोकांमध्ये निर्माण झालेली भीती घालवण्यासाठी मासिक अहवाल पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या ईएमए मध्ये प्रसिद्ध केला जाणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, तसेच या लसींच्या परिणामांबद्दल केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या डाव्यांचे पुरावे नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.  

सॅंडस्टॉर्म: चीनी हवामान प्रशासनाने बीजिंगमध्ये येलो अलर्ट जाहीर केला

दरम्यान, लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी होण्याच्या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचा धोका नसल्याचे स्पष्टीकरण अ‍ॅस्ट्राझेनेकाने दिले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून युरोपियन युनियन आणि युकेमधील लसीकरण झालेल्या 17 दशलक्षाहून अधिक व्यक्तींच्या आरोग्य अहवालाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यावरुन त्यांनी या संबंधीचा निष्कर्ष काढला आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने म्हटले आहे की, युरोपीयन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतलेल्या आहेत. आणि त्यानुसार चाचण्यांमध्य़े कोणतीही चिंता करण्याचे कारण दिसून आले नाही. मासिक अहवाल पुढच्या आठवड्यामध्ये EMA वेबसाइटवर लोकांच्या खात्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहाय्याने अ‍ॅस्ट्राझेनेका लस तयार करण्यात आली आहे. ही लस युरोपियन युनियन आणि बऱ्याच देशांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत अमेरिकेने अ‍ॅस्ट्राझेनेकाला अधिकृत मान्यता दिलेली नाही.  

            

            

संबंधित बातम्या