भारतीय दाम्पत्याचा VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल; आयुष्यात असं वेड पाहिजेच

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

तुमच्या मनाला काय वाटते, काय आवडते त्या पध्दतीने तुम्ही जगायला पाहिजे. आयूष्यासाठी वेड होता यायला पाहिजे. असेच वेड एक भारतीय दांम्पत्याला सध्या लागले आहे.

वॉशिंग्टन: आयुष्यात भरभरून जगायचं असेल तर थोड वेड व्हाव लागतं. लोक काय म्हणतील हा विचार केला तर आपण आपल्या जीवनाचा आनंद घेवूच शकत नाही. तेव्हा तुमच्या मनाला काय वाटते, काय आवडते त्या पध्दतीने तुम्ही जगायला पाहिजे. आयूष्यासाठी वेड होता यायला पाहिजे. असेच वेड एक भारतीय दांम्पत्याला सध्या लागले आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका जोडीने धोतर आणि साडी घालून बर्फावर स्कीइंग केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमेरिकेतल्या मिन्‍नेसोटा राज्‍यातील लोकप्रिय असलेल्या स्‍की विलेज वेल्‍च येथे हे दांम्पत्य स्कीइंग करत आहेत. वेल्‍च विलेजमध्ये पांढऱ्या शुभ्र बर्फात पांढरे शुभ्र धोतर परिधान करून मधू आणि निळ्या साडीमध्ये दिव्या स्कीइंग करतांना दिसत आहे.

व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

या भारतीय जोडप्याचा व्हिडिओ अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील वेलच विलेज मधला आहे. धोती आणि साडीतील भारतीय वंशाच्या दिव्य आणि मधुच्या या स्कीइंगचा आनंद घेत आहे. दिव्या आणि मधूने आपल्या या स्कीइंगचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना दिव्याने लिहिले की, आपल्याला काहीतरी वेड्यासारख करण्यासाठी मद्यप्राशन करायची गरज नाही. तर फक्त स्वत:ला थोडं वेड करण्याची गरज आहे. व्हिडिओमध्ये दिव्य आणि मधु साडी आणि धोतर परिधान करत स्कीइंग करत असल्याचे  दिसत आहे. काही सेकंदांनंतर ते दोघे बर्फाच्छादित डोंगरावर स्कीइंग करताना दिसले.

मोदी सरकारचा सेलिब्रेटिंवर टि्वटसाठी दबाव? राज्य सरकार करणार चौकशी -

दिव्याने निळ्या रंगाची साडी नेसली आहे, तर मधुने ग्रीन शर्ट आणि धोतर परिधान केले आहे. जेव्हापासून त्याने हा व्हिडिओ शेअर केला तेव्हापासून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुमारे 13 हजार लोकांनी या  व्हिडिओला लाइक केले आहे. मोठ्या संख्येने लोक या व्हिडिओवर कमेंट देत आहेत. आणि सोबतच या जोडप्याचे कौतुक सुध्दा करत आहेत. 

व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या