इस्रायल आणि गाझा हवाई हल्ल्यात घाबरलेल्या 'त्या' मुलीचा व्हिडिओ व्हायरल   

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल (Israel) आणि गाझामध्ये (Gaza)  हमासविरुद्ध (Hamas)   भयंकर हवाई हल्ले सुरू आहेत. मागच्या सोमवारी झालेल्या हिंसाचारात गाझापट्टीमध्ये 58 मुले आणि 34 महिलांसह जवळपास 197 लोक ठार झाले.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल (Israel) आणि गाझामध्ये (Gaza)  हमासविरुद्ध (Hamas)   भयंकर हवाई हल्ले सुरू आहेत. मागच्या सोमवारी झालेल्या हिंसाचारात गाझापट्टीमध्ये 58 मुले आणि 34 महिलांसह जवळपास 197 लोक ठार झाले. तर इस्राईलमध्ये दोन मुलांसह 10 मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी पहाटे दहा मिनिटांच्या अंतरांनी झालेल्या स्फोटांमुळे गाझा शहराचा उत्तर-दक्षिण भाग हादरून गेला.  या हल्ल्यामध्ये  गाझाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच  या भयंकर वातावरणामुळे घाबरलेल्या एका दहा वर्षांच्या पॅलेस्टिनी मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती आपली व्यथा व्यक्त करताना दिसत आहे.  एक मिनिट 19 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये गाझा येथे राहणारी नादिन अब्देल टैफ नावाची एक निरागस मुलगी इस्त्रायली हवाई हल्ल्यानंतर  कोसळलेल्या इमारतींच्या ढीगाऱ्याजवळ उभी आहे.  (The video of 'that' girl frightened by the Israeli and Gaza airstrikes has gone viral) 

चीनी पुरूषांचे गुडघ्याला बाशिंग; तरीही नवरी मिळेना नवऱ्याला

इस्त्रायली हवाई हल्ल्यामुळे ती प्रचंड घाबरलेली दिसत आहे.  'हे जे काही सुरू आहे ठीक नाही. व्हिडिओमध्ये, भावनिक नादिनने तिच्यावर आणि आजूबाजूच्या लोकांवर हल्ले का केले जात आहेत,   मला माझ्या लोकांना मदत करायची आहे, पण मी त्यांना मदत करू शकत नाही. हे सर्व पाहून मला खूप भीती वाटत आहे. मी फक्त 10 वर्षांची आहे. आता मी काय करावं? असा सवाल  तिने केला आहे.  तसेच, मी ही परिस्थिती हाताळू शकत नाही, मला डॉक्टर व्हायच आहे पण मी अजून लहान आहे. या सर्वांची मला खूप भीती वाटत आहे. मी माझ्या लोकांसाठी काहीही करू शकते पण काय करावे हे मला कळत  नाही. असेही नादिन म्हणताना दिसत आहे. 

दरम्यान, नादिनच्या या व्हीडिओ वर अनेकांनी सहानुभूति दर्शवली आहे. आतापर्यंत 11 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. सोशल मीडियावर, गाझा पट्टीतील या संकटात अडकलेल्या लोकांच्या  या परिस्थितीवर अनेकांनी दुख व्यक्त केले आहे.  त्यांनी इथल्या लोकांना सहानुभूती दर्शविली आहे. इस्रायलने पॅलेस्टाईनच्या भूभागावर डझनभर हवाई हल्ले केल्यापासून गाझाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. तर त्याचवेळी हमास या दहशतवादी संघटनेनेदेखील इस्रायलच्या शहरांवर हल्ले सुरू ठेवले आहेत.  तर या युद्धबंदीसाठी अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाहन करण्यात येत आहे. 

 

संबंधित बातम्या