Video: पाकिस्तानी संसदेत शिव्या, आरडाओरड, अन.. गोंधळाचे Live टेलिकास्ट

Video: पाकिस्तानी संसदेत शिव्या, आरडाओरड, अन.. गोंधळाचे Live टेलिकास्ट
PAKI.jpg

शाळेमध्ये अनेकदा गोंधळ सुरु असताना शिक्षक (Teacher), 'अरे आपला वर्ग हा मासळी बाजार आहे का,' अशा शब्दामध्ये आपला संताप व्यक्त करतना दिसतात. मात्र सध्या पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani citizens) असाच प्रश्न संसदेमधील (Parliament) घडलेल्या प्रकारानंतर पडला असेल. 'मासळी बाजार की राष्ट्रीय संसद' असा प्रश्न विचारावा लागेल एवढा मोठा गोंधळ मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेमध्ये पहायला मिळाला. शिव्या, फाईल्स, आरडाओरड एवढ्यावरच न थांबता एकमेंकावर धावून जाण्याचा प्रयत्न संसद सदस्यांनी केला. संसदेतील गोंधळ पाकिस्तानी जनतेनं प्रसारमाध्यमांवर लाईव्ह पाहिला.

पाकिस्तानी संसदेतील कनिष्ठ सभागृह अर्थात नॅशनल असेंब्लीमध्ये (National Assembly) प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. कनिष्ठ सभागृहामध्ये विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी नेत्यांनी एकमेकांचा सन्मान न राखता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांवर फाईल्स फेकून मारल्या. या खासदारांनी एवढ्यावरच न थांबता एकमेकांना मारण्याचा देखील प्रयत्न केला.तसेच या खासदारांनी एकमेकांच्या आई आणि बहिणींचाही उध्दार केला. धक्कादायक बाब म्हणजे कनिष्ठ सभागृहामध्ये असलेल्या महिला खासदारांसमोरच हा शिवीगाळ करणारा प्रकार सुरु होता.  मात्र संसदेतील ही परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले. (Video Live Telecast of Swearing Ardaord Un Confusion in Pakistani Parliament)

नेमकं घडलं काय?
पाकिस्तामनमधील प्रसिध्द असणारे वृत्तपत्र द डॉन ने दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरुन वांदग सुरु झाला. पाकिस्तानचे माजी पंतरप्रधान नवाज शरीफ(Nawaz Sharif) यांचे धाकटे बंधू शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) हे सभागृहाला संबोधित करत होते. गेल्या आठवड्यात इम्रान खान सरकारने सादर केलेल्या अर्थसंल्पाच्या संदर्भात शहबाज शरिफ बोलत होते. मात्र त्याचवेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ते एकमेकांना शिव्या देण्यास सुरुवात केली. शिव्या देतानाचा अली अवान यांनी त्यांच्या हातात असलेले पुस्तक विरोधी पक्षातील नेत्यांच्या दिशेने भिरकावले. त्यानंतर काय सर्वच खासदार एकमेकांकडे हातात भेटेल त्या वस्तू फेकून मारु लागले. आणि बघता बघता संसदेला युध्दभूमीचे स्वरुप प्राप्त झाले. सोशल मिडियावर या गोंधळाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले.

इम्रान खान यांच्यावर साधला निशाणा
पीएमएल-एनच्या खासदार मरियम औरंगजेब(Maryam Aurangzeb) यांना इम्रान खान सरकारवर देशातील संसदीय व्यवस्थेला कमकुवत करण्याचा आरोप केला. खान यांच्या हाच नवा पाकिस्तान आहे ज्यामध्ये फॅसिस्ट शक्तींचं वर्चस्व आहे. इम्रान खान यांची एकंदरीत फॅसिस्ट मानसिकता दिसून येते. तसेच पाकिस्तानी संसदेला लाचार बनवण्याचा प्रयत्न इम्रान खान यांनी केला आहे. त्यामुळे देशात असलेल्या लोकशाहीची पुरती कंबर मोडली आहे, अशा शब्दात मरियम यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com